ब्रसेल्स : रशिया आणि यूक्रेन मधील युद्ध ( Russia-Ukraine war )अजूनही सुरु आहे. जग या युद्धाचे परिणाम बघत आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता हानी झाली असून अनेकांचे जीव देखील गेले आहेत. युद्धाबाबत यूरोपीय यूनियन काउंसिलचे (european union council) अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हटले की, यूरोपीय संघ या युद्धात सहभागी नाही. रशिया टुडेच्या बातमीनुसार, चार्ल्स मिशेलने म्हटलं की, पश्चिमेकडील देशांना मॉस्को आणि कीवमधील संघर्षात सहभागी व्हायचं नाहीये.
चार्ल्स मिशेल (Charles Michel) यांनी म्हटलं की, रशिया (Russia) आणि नाटो (NATO) यांच्यातील युद्ध हे अणुयुद्धा पेक्षा कमी नसेल. फ्रान्सचे वर्सायमध्ये झालेल्या यूरोपीय संघांच्या शिखर संमेलनात बेल्जियमचे माजी पंतप्रधान एल पेस यांनी म्हटलं की, 'रशिया एक अणुशक्ती आहे आणि आपल्याला माहित आहे की, जर हा संघर्ष नाटो आणि रशिया असा झाला तर याचा परिणाम तिसऱ्य़ा महायुद्धाच्या रुपात बदलू शकतो.'
यूक्रेन नाटोकडे मदतीची मागणी करत आहे. पण NATO ला देखील याच गोष्टीची भीती आहे. त्यामुळे त्यांनी रशिया विरोधात संघर्षास नकार दिला आहे.
मिशेल यांनी म्हटलं की, सगळा संघर्ष नाटकीय, चरम आणि कठिण असतात. पण रशियाकडे असलेली अणू क्षमता विचार करायला लावणारी आहे., 'मी व्यवहाराने बोलतो. लष्करी कारवाईमुळे प्रभावित भागात मानवीय उपस्थिती, युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पांची स्थिती आणि मॉस्को आणि कीवमधील शांतता चर्चा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर युरोपने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
मिशेल यांनी म्हटलं की, 'आज क्रेमलिनमध्ये जो कोणी आहे त्याच्यासोबत चर्चा केली पाहिजे. लोकशाहीवादी देशांनी सर्व देशांसोबत चर्चा केली पाहिजे.'