रशियन आक्रमणादरम्यान, वायरल होणाऱ्या फोटोमधील खतरनाक महिला कोण? जाणून घ्या

रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्यांदरम्यान, एका महिलेची जोरदार चर्चा आहे. हातात बंदूक घेतलेल्या या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलिसा नावाची ही महिला युक्रेनच्या सैन्यातील असल्याचा दावा केला जातोय.

Updated: Feb 25, 2022, 09:19 AM IST
रशियन आक्रमणादरम्यान, वायरल होणाऱ्या फोटोमधील खतरनाक महिला कोण? जाणून घ्या title=

कीव : युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या दरम्यान, आधुनिक बंदुकधारी महिला सैनिकाकाचा फोटो व्हायरल होत आहे.  या महिलेचे नाव अलिसा असून ती मूळची युक्रेनची राजधानी कीवची आहे. अलिसाचे वय 38 वर्षे असून तिला 7 वर्षांचे एक मूलही आहे. ती सशस्त्र दलांच्या मिलिटरी रिझर्व्ह नावाच्या प्रादेशिक संरक्षण दलाचा भाग आहे.

एक वर्ष कठोर प्रशिक्षण 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दलात सामील होण्यासोबतच, अलिसा सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत मीडिया रिलेशन स्पेशलिस्ट देखील आहे. 

आलिसाने तिच्या ऑफिस जॉबसोबत शूटिंगचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर तिने लढाऊ कौशल्ये शिकली, ज्यासाठी तिला सुमारे 1 वर्ष लागले. त्यानंतर ती डिफेन्स युनिटमध्ये रुजू झाली.

तसेच, आलिसाने आपले कौशल्य युद्धात वापरावे असे तिला वाटत नाही. कारण ती युद्धाकडे विनाशाच्या नजरेने पाहते.

50 देशांचा प्रवास 

अलिसा ही मोटारसायकलची मोठी फॅन आहे आणि तिने पतीसोबत जवळपास 50 देशांचा प्रवासही केला आहे.