मॉस्को : रशियन मॉडल ग्रेटा वेडलर (Russian Model Gretta Vedler) चा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक सूटकेस बॅगमध्ये या मॉडलचा मृतदेह सापडला आहे. 23 वर्षाची ग्रेटा काही महिन्यांपासून बेपत्ता होती. पण तिचं सोशल मीडिया अकाउंट सुरु होतं. ग्रेटा पहिल्यांदा चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना सायकोपॅथ (मनोरुग्ण) म्हटलं होतं.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, मॉडल ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स-बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविन (Dimitry Korovin) ने केली होती. कोरोविनने ग्रेटाचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरुन गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवला होता.
कोरोविनने गुन्हा कबुल केला आहे. दिमित्री कोरोविनने ग्रेटाची हत्या पैशांच्या वादातून केली होती. तिच्या हत्येनंतर ही तो 3 दिवस तिच्या मृतदेहासोबत रुममध्ये झोपला होता, अशी माहिती चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली होती.
ग्रेटाच्या (Gretta Vedler) मृत्यूनंतर ही तो तिचे सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता. ज्यामुळे कोणाला ही तिच्या मृत्यूची कल्पना येऊ नये.
सध्या यूक्रेन सोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियन मॉडेलचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थि होत होते. कारण तिने उघडपणे पुतिन यांच्यावर टीका केली होती.