Shocking news : जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची हत्या

‘स्पुटनिक व्ही’ करोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची गळा आवळून हत्या. व्लादिमीर पुतीन यांनी केलं होतं सन्मानित. 

Updated: Mar 5, 2023, 07:22 PM IST
Shocking news : जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची हत्या  title=

Sputnik V COVID-19 vaccine : 2019 मध्ये जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला. यानंतर कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये संपूर्ण जगात लॉकडाऊन लागला. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरना व्हायरसवर नेमकं कोणत औषध सापडल नव्हत. त्यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस विकसीत करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवस रात्र एक करु लागले. अखेरीस  रशियातील  वैज्ञानिकांच्या चमूला कोरोनाची लस बनवण्यात यश आले.  स्पुतनिक V ही जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या याच रशियन वैज्ञानिकांच्या चमूतील एका वैज्ञानिकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. 

आंद्रे बोटीकोव्ह (वय 47 वर्षे) असे या मृत  वैज्ञानिकाचे नाव आहे. आंद्रे बोटीकोव्ह हे एक रशियन वैज्ञानिक आहेत. स्पुतनिक V ही जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या रशिया  वैज्ञानिकांच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता. 
राहत्या घरीच आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. परिचाच्या व्यक्तीनेच आंद्रे बोटीकोव्ह यांची हत्या केली आहे. या प्रकरणी 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. 

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधील अपार्टमेंटमध्ये आंद्रे बोटीकोव्ह राहत होते. राहत्या अपार्टमेंटमध्येच  आंद्रे बोटीकोव्ह यांचा मृतदेह आढळून आला होता.  आंद्रे बोटीकोव्ह याची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर काही तासांतच पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. पोलिस तपासात आरोपी दोषी आढळला.

यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी त्याने कोर्टात देखील आपला गुन्हा कबूल केला.  मॉस्कोच्या खोरोशेवो जिल्हा न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रशियन वृत्तसंस्थेने याबबतचे वृत्त दिले आहे. 
याप्रकरणी मॉस्को पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. आंद्रे बोटीकोव्ह हत्या प्रकरणी 29 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने हत्येची कबुली दिली असल्याची माहिती या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. अटक संशयीत आरोपीवर यापूर्वीसुद्धा हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती या निवदेनात देण्यात आली आहे.

कोण आहेत आंद्रे बोटीकोव्ह?

2021 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रे बोटीकोव्ह यांना ऑर्डर ऑफ द फादरलँड पुरस्काराने सन्मानित केले होते. अहवालानुसार, 2020 मध्ये जगातील पहिली नोंदणीकृत वेक्टर लस स्पुतनिक V तयार करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांमध्ये बोटीकोव्हचा समावेश होता.  ही लस रशियातील गमलाया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे. COVID-19 च्या प्रतिबंधासाठी रशियन आरोग्य मंत्रालयाने 11 ऑगस्ट 2020 रोजी स्पुतनिक V ची नोंदणी केली होती.