जगातील सर्वात मोठा बॅक्टेरिया पाहिलात का? आकार पाहून शास्त्रज्ज्ञांचे डोळेही विस्फारले

हा बॅक्टेरिया डोळ्यांना दिसण्यासारखा आहे. 

Updated: Jun 25, 2022, 12:27 PM IST
जगातील सर्वात मोठा बॅक्टेरिया पाहिलात का? आकार पाहून शास्त्रज्ज्ञांचे डोळेही विस्फारले title=

मुंबई : शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात मोठ्या बॅक्टेरियाचा शोध लावला आहे. या बॅक्टेरियाची लांबी 0.4 इंच इतकी आहे. कॅरिबियनमधील लेसर अँटिल्समधील ग्वाडेलूपमधील खारफुटीच्या दलदलीच्या पाण्यात पुरलेल्या पानांवर थिओमार्गारिटा मॅग्निफिका नावाच्या बॅक्टेरियाची एक प्रजाती आढळल्याचा दावा शास्त्रज्ज्ञांनी केला आहे.

हा बॅक्टेरिया डोळ्यांना दिसण्यासारखा आहे. हा बॅक्टेरिया पांढर्‍या रंगाच्या शेवयाच्या आकाराप्रमाणे आहे. यामध्ये सूक्ष्म सल्फर ग्रॅन्युल असतात. यामुळे ते मोत्यासारखा चमकतो.

कॅलिफोर्नियातील सागरी जीवशास्त्रज्ञ जीन-मेरी वोलांड म्हणाल्या, "सामान्य बॅक्टेरियांपेक्षा हा सुमारे 5 हजार पट मोठा आहे. हा बॅक्टेरिया खारफुटी पर्यावरणातील गाळाच्या वर वाढतोय."

मुळात हे फ्रेंच अँटिल्स विद्यापीठाच्या ऑलिव्हर ग्रोस यांनी 2009 मध्ये शोधलं होतं. पण त्या काळात ते कोणाच्याही लक्षात आलं नाही. कारण त्याच्या आकारामुळे ग्रोस यांनी ही बुरशी असल्याचा समज झाला होता.

बॅक्टेरिया हे सूक्ष्म एक पेशी असलेला जीव आहेत. या जीवांना केंद्रक नसतं. बॅक्टेरिया पृथ्वीवर जवळजवळ सर्वत्र आढळतात आणि पृथ्वीच्या परिसंस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा बॅक्टेरिया आहे हे समजण्यासाठी ग्रॉस आणि इतर संशोधकांना पाच वर्षे लागली.