Sex Worker Life: 'फक्त 3 महिने कर..' बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात

Sex Worker Story: डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.

Pravin Dabholkar | Updated: Jul 15, 2023, 10:41 AM IST
Sex Worker Life: 'फक्त 3 महिने कर..' बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात title=

Sex Worker Life: सेक्स वर्कर असणाऱ्या बहुतांश महिला स्वत:च्या मर्जीने या क्षेत्रात आलेल्या नसतात. आजुबाजूची परिस्थिती, अन्याय, सामाजिक अस्थिरतेला बळी पडून त्यांना या क्षेत्रात जबरदस्ती टाकले जाते. गरिबी, अंधार, आजारांची भीती आणि रोज मरणे हे सेक्स वर्कर्सचे जीवन बनले आहे. त्यांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पाडले जाते. ज्यात त्यांचे बालपण संपण्यापूर्वीच तुडवले जाते. जीवनाचा अर्थ समजेपर्यंत आयुष्य अंथरुणावर पडून जाते. अशीच एक वेदनादायक कथा नायजेरियात राहणाऱ्या डायमंडने (नाव बदलले आहे) कथन केली आहे. डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.

अलजझीराशी बोलताना डायमंडने ही माहिती दिली. ती 32 वर्षांची असताना तिला वेश्याव्यवसायात येण्यात भाग पाडले गेले. डायमंड ही तिच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. वयाच्या 15 व्या वर्षी नायजेरियातील बेनिन शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी तिचा विवाह झाला. लग्नादरम्यान तिच्या पतीने तिला चांगले आयुष्य देण्याचे वचन दिले होते. सर्व काही ठीक चालले होते आणि एका वर्षानंतर ती तिच्या पहिल्या मुलाची आई देखील बनली. दोघांच्या आयुष्यात आनंद आला. तीन वर्षांनंतर ती पुन्हा गरोदर राहिली. आता मात्र तिच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले होते. काण ती गरोदर असतानाच तिचा नवरा तिला सोडून गेला. माझे कुटुंब खूप गरीब असल्याने पती गेल्यानंतर मुलांचे संगोपन करणे कठीण झाले. त्यामुळे अनेक दिवस मला आणि मुलांना उपाशी झोपावे लागल्याचे डायमंड सांगते. 

३ महिने सांगून आयुष्यभराचा नरक 

यादरम्यान एका मित्रासोबत माझी ओळख झाली. माझी अवस्था पाहून त्याने मला घाना येथे जाण्याचा सल्ला दिला. तिथे तू सेक्स वर्कर म्हणून खूप पैसे कमवू शकतेस. ज्याच्या मदतीने तू मुलांचे तसेच आई-वडील, बहिणी आणि भावांचे जीवन सुधारू शकतेस असे त्याने सांगितले. 

प्रश्न पोटाचा होता. त्यामुळे मी माझ्या मित्राचा सल्ला ऐकला. त्याच्या सल्ल्यानुसार घानाला जाऊन सेक्स वर्क निवडल्याचे ती सांगते. एका महिलेच्या माध्यमातून ती घाना येथे आली. जास्त काळ नाही तर अवघे तीन महिने सेक्स वर्कर म्हणून काम करावे लागेल. यासाठी तुला चांगले कपडे, राहण्यासाठी घर आणि $780 (रु. 64,024) मिळतील. आणि तीन महिन्यांनंतर तू मोकळी होशील असे तिने सांगितले होते.

लायबेरिया, आयव्हरी कोस्ट आणि टोगो येथे नागरिकांची वस्ती असलेल्या  घानाच्या कासोवा शहरात महिलेने डायमंडला बोलावले होते. येथे अनेक रेड लाइट एरिया आहेत. 'जेव्हा डायमंड कासोव्याला पोहोचली तेव्हा तिच्यासारख्या आणखी 10 नवीन मुली तिथे आधीच हजर होत्या. त्यांनीही अवघड परिस्थितीमुळे हा व्यवसाय निवडला होता. 

एक छोटेसे घर आम्हा सर्वांना दिले. ज्यामध्ये ना बेड होता ना एसी, ना वॉर्डरोब. आम्हाला जमिनीवर झोपायला लावले. ते घर तुरुंगासारखं होतं. तिथे टीव्ही, रेडिओ बसण्यासाठी खुर्ची नव्हती. घरदेखील खूप अस्वच्छ होते, असे डायमंड सांगते.

स्वर्गाचे स्वप्न पाहिले, नरक मिळाला

डायमंडने सांगितले की, या घरात राहणे सोपे नव्हते. पण मी मजबूर होती. ती अशा दलदलीत अडकली होती जिथे तिला इच्छा असूनही परत जाता येत नव्हते. स्वर्गासारख्या वातावरणात ठेवले जाईल असे वचन इथे येण्यापूर्वी देण्यात आले होते पण मला आणून नरकात ठेवले गेल्याचे दु:ख ती बोलून दाखवते. 

जेव्हा मी पहिल्यांदा खोलीत गेले तेव्हा माझी खूप निराशा झाली. ती स्त्री माझ्याशी खोटे बोलली. तिला फक्त आमचं शोषण करून पैसे कमवायचे होते, हे डायमंडच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. 

आपल्या मुलांना नायजेरियाला पाठवू शकेल इतकेच पैसे ती देत असे. आता मात्री मी माझ्या मित्रांच्या मदतीने नायझेरियाला परतल्याचे डायमंड सांगते. यानंतर त्या नरकमय जीवनाबद्दल तिने अल जझीराला माहिती दिली.