ही कोणती नोकरी? महिला असं काम करुन पैसे कमावतेय, ऐकून तुम्हाला पडेल प्रश्न

काळाच्या ओघात आपल्याला अशा काही वेगवेगळ्या प्रोफेशन विषयी समोर येतं, जे आपण कधी एकलं नसावं.

Updated: Jun 16, 2022, 06:42 PM IST
ही कोणती नोकरी? महिला असं काम करुन पैसे कमावतेय, ऐकून तुम्हाला पडेल प्रश्न title=

मुंबई : काळाच्या ओघात आपल्याला अशा काही वेगवेगळ्या प्रोफेशन विषयी समोर येतं, जे आपण कधी एकलं नसावं किंवा अशी देखील एखादी नोकरी असू शकते, याचा आपण विचार देखील केला नसावा.  आज आम्ही तुम्हाला अशा प्रोफेशनबद्दल सांगणार आहोत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. एक महिला या व्यवसायातून भरपूर कमावते. तुम्ही व्हॉईस डबिंग, व्हॉईस रेकॉर्डिंगबद्दल ऐकले असेलच. लोक तेथे गोड आणि मधुर आवाजाने खूप प्रसिद्ध होतात, पण तुम्हाला माहिती आहे का की, ओरडूनही पैसे कमावता येतात? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे.

आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबद्दल सांगणार आहोत, जी केवळ ओरडून पैसे कमवते. विशेष म्हणजे या कामासाठी तुमचा आवाज आवश्यकतेनुसार परिपूर्ण असावा. जे लोक हे करतात त्यांना स्क्रीमिंग आर्टिस्ट म्हणतात.

ऍशले पेल्डन नावाची महिला या कलेमध्ये पारंगत आहे आणि ओरडणे हा तिचा व्यवसाय आहे.

किंचाळणार्‍या किंवा ओरडणाऱ्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, हे लोक माईकसमोर तासनतास वेगवेगळ्या प्रकारच्या किंकाळ्या काढतात, जे रेकॉर्ड केले जातात आणि चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये वापरले जातात.

आता तुम्हाला समजले असेल की, भूत पाहिल्यानंतर किंचाळणारी अभिनेत्री किंवा गर्जना आणि रडणारा आवाज किती परिपूर्ण आहे. होय, हेच या कलाकारांचे आश्चर्य आहे.

ऍशले पेल्डन या कलेत पारंगत आहेत. नैसर्गिकरीत्या विविध प्रकारच्या किंकाळ्या काढण्याची कला तिच्या अंगी आली असून तिचा वापर करून ती पैसे कमवत आहे. अॅशले चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये किंचाळणाऱ्या दृश्यांना तिचा आवाज देते. गार्डियनमधील त्यांच्या लेखात त्यांनी लिहिले आहे की, हे स्टंट मॅनसारखे आहे.

तुम्हाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे ओरडावे लागेल. यामध्ये केव्हा आणि कसे थांबायचे हे, आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

जेव्हा ती 7 वर्षांची होती, तेव्हाच तिला तिच्या प्रतिभेची जाणीव झाली. ती चाइल्ड ऑफ अँगर नावाच्या एका चित्रपटात काम करत होती, ज्यामध्ये अनेक किंचाळणारे दृश्य होते. त्याच वेळी ती या व्यवसायाकडे वळली. वयाच्या 20-25 पर्यंत तिने 40 चित्रपट आणि टीव्ही मालिकांना आपला आवाज दिला आहे.