wife swapping चा धक्कादायक प्रकार, चार पुरुष करत होते पत्नींची अदलाबदल

गेली आठ वर्ष हा धक्कादायक प्रकार सुरु होता, आधी झोपेच्या गोळ्या देत होते नंतर बनवत होते Video  

Updated: Nov 4, 2022, 06:35 PM IST
wife swapping चा धक्कादायक प्रकार, चार पुरुष करत होते पत्नींची अदलाबदल title=
प्रतिकात्मक फोटो

Shocking News : पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार 
जणांना अटक करण्यात आली असून लवकरच त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. सोशल मीडियावर (Social Media) ऑनलाईनच्या (Online) माध्यमातून हे चार जण एकमेकांच्या संपर्कात आले होते. स्वत:च्या पत्नींना झोपेच्या गोळ्या देऊन ते पत्नीची अदलाबदली (wife swapping) करत असत. 

सिंगापूरमध्ये (Singapore) ही धक्कादायक घटना घडली आहे. चारही जण स्वत:च्या पत्नींना झोपेच्या गोळ्या देऊन त्यांची आपापसात अदलाबदल करत होते. त्यानंतर त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित करत. संतापजनक म्हणजे बेशुद्ध असताना त्या महिलांचे व्हिडिओही बनवले जात होते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होता. पोलिसांनी आरोपींची ओळख जाहीर केलेली नाही. 

याप्रकरणी दोन आरोपींना 19 त 23 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तर दोन आरोपींपैकी एकाला 17 ते 21 तर एकाला 11 ते 16 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

2010 ते 2018 या दरम्यान महिलांच्या लैंगिक शोषणाचा हा प्रकार सुरु होता. चारही आरोपी एका ऑनलाईन अॅपवर भेटले होते. यापैकी एक आरोपी इतर तीन जणांना झोपेच्या गोळ्या द्याचचा. तसंच त्यांना अंमलीपदार्थही पुरवायचा.

असा झाला wife swapping पर्दाफाश
आठ वर्ष सुरु असलेला हा प्रकार चार आरोपींपैकी एकाही पत्नीचा लक्षात आला नव्हता. पण एकेदिवशी यातल्या एका आरोपीच्या मोबाईलवर त्याच्या पत्नीने स्वत:चे आणि इतर महिलांचे काही आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओ पाहिले. ते पाहून तिला धक्काच बसला. तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.