मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा Video

Singapore Airlines Turbulence video :  टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सौरभ तळेकर | Updated: May 21, 2024, 09:50 PM IST
मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा Video title=
Singapore Airlines Turbulence

Singapore Airlines Turbulence Video: लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने (London Singapore Flight) मंगळवारी बँकॉकमध्ये हवेतील गंभीर अशांततेमुळे (Flight Air Turbulence) आपत्कालीन लँडिंग केल्याची माहिती सिंगापूर एअरलाइनने दिली आहे. एअरलाइनने सांगितले की, प्रवास करत असलेल्या एक प्रवासी मृत्यू झालाय तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. 211 प्रवासी आणि 18 कर्मचारी असलेले बोइंग 777-300ER विमान सिंगापूरकडे निघाले होते तेव्हा त्याचे आपत्कालीन लँडिंग झालं, असं एअरलाइनने (Singapore Airlines) एका निवेदनात म्हटलं आहे.

सिंगापूर एअरलाइन्सच्या बोइंग 777-300ER फ्लाइटने लंडनहून भारतीय वेळेनुसार दुपारी 2:45 वाजता उड्डाण केलं. टेकऑफनंतर 11 तासांनंतर खराब हवामानामुळे विमानाच्या टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ठरल्याप्रमाणे विमान आपल्या मार्गावर असताना अंदमानचा समुद्र पार केल्यानंतर विमान 5 मिनिटांत 37 हजार फूट उंचीवरून अचानक 31 हजार फूट खाली आलं. हे विमान दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी सिंगापूरमध्ये उतरणार होतं. मात्र, प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावी लागली.

विमान आपत्कालीन परिस्थिती उतरल्यानंतर लगेचच रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचल्या अन् जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक व्यक्ती यामध्ये मृत पावल्याची माहिती सिंगापूर एअरलाईन्सकडून देण्यात आलीये. तसेच एअरलाइन्सने मृत प्रवाशाच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त देखील केलाय. सर्व प्रवाशांना योग्य ती मदत पुरवली जात असल्याची माहिती विमान कंपनीकडून देण्यात आली आहे.

टर्ब्युलेन्स म्हणजे हवेच्या प्रवाहात व्यत्यय आणणं. जेव्हा विमान उडत असतं, तेव्हा स्थिरपणे उडण्यासाठी पंख्याखालील हवा नियमित करण्याती गरज असतेय हवामान किंवा इतर कारणांमुळे हवेतील अशांतता निर्माण होते. अशावेळी वैमानिकला फ्लाईटची उंची कमी करावी लागते. विमानाची उंची कमी होत असताना सीट बेल्ट लावण्याचा इशारा दिला गेला नव्हता, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात आलाय.