जापानमध्ये बहीण भाड्याने मिळते, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

जापानमध्ये लोक भाड्याने बहीण घेऊ शकतात. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे.

Updated: Jun 15, 2022, 07:58 PM IST
जापानमध्ये बहीण भाड्याने मिळते, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का title=

Sister On Rent: आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशा कुटुंबाला पूर्ण कुटुंब संबोधलं जातं. कारण अशा कुटुंबात सर्वच नाती व्यवस्थितरित्या जोपासली जातात. असं असलं तरी काळ आणि वयानुसार माणूस एकाकी पडतो. कुटुंब वेगवेगळ्या कारणांमुळे विभागले जाते आणि संपूर्ण कुटुंब असूनही लोक एकाकीपणा आणि नैराश्यासारख्या गंभीर आजारांशी झुंज देतात. 

एकाकीपणावर मात करण्यासाठी अनेक वेळा लोक गॅजेट्स आणि पाळीव प्राण्यांची मदत घेतात. परंतु अनेक वेळा ते नैराश्यावर मात करू शकत नाहीत. अशा एकटेपणाने ग्रासलेल्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी जापानमध्ये एक विशेष सेवा सुरु केली आहे.

जापानमध्ये लोक भाड्याने बहीण घेऊ शकतात. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. जापानमधील तरुण हिकिकोमोरी नावाच्या मेंदूच्या समस्येने त्रस्त आहेत. या मन:स्थितीत तरुण, विशेषत: पुरुष समाजापासून पूर्णपणे दुरावतात आणि घराबाहेर पडू इच्छित नाहीत.  यामुळे तो कधी महिने तर कधी वर्षानुवर्षे शाळेत जात नाही किंवा फिरायलाही जात नाही. मोबाईल गेम्स किंवा इंटरनेटमध्ये ते स्वतःचे विश्व निर्माण करतात. 

तरुणांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जापानमध्ये बहिणींची नियुक्ती केली जाते. या मुली तरुणांना एका कुटुंबासारख्या वाटतात, ज्यामुळे लोकांचा एकटेपणा दूर होतो. 'ड्रीम स्टार्ट' नावाच्या जपानी कंपनीने अशा लोकांना मदतीचा हात पुढे केला जातो.