'ह्या' चिमुकलीने 'बेबी बेबी' या गाण्यावर केला अफलातून डान्स

जस्टिन बिबरच्या चाहत्यांना वयाची मर्यादा नाही. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 29, 2018, 11:41 PM IST
'ह्या' चिमुकलीने 'बेबी बेबी' या गाण्यावर केला अफलातून डान्स  title=

मुंबई : जस्टिन बिबरच्या चाहत्यांना वयाची मर्यादा नाही. 

अगदी चिमुकल्यांपासून ते सिनिअर सिटिजन्सपर्यंत आणि अगदी भारतापासून ते परदेशापर्यंत जस्टिनचे चाहते आहेत. असाच एक जस्टिनच्या फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही चिमुकली अवघ्या 4 - 5 वर्षांची असेल तिचा बेबी बेबी या साँगवरील डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या मुलीचे एक्सप्रेशन आणि तिचा कॉन्फिडन्स अगदी वाखाण्याजोगा आहे. जस्टिन बिबर आपल्या या बेबी बेबी साँगमुळेच अधिक लोकप्रिय झाला आणि याच गाण्यावर ही मुलगी अतिशय सुंदर नाचत आहे. 

हा व्हिडिओ 21 जानेवारीला सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आठ दिवसांत या व्हिडिओने 2.9 मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत आहे.