Snakes Video: सोशल मीडियावर एकापेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ काही क्षणातच वेगाने व्हायरल होतात. कारण या व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती असते. साप आणि वन्यप्राण्यांच्या व्हिडीओंना अशीच पसंती मिळते. सापाचे व्हिडीओ म्हटलं की जीव की प्राण असतो. दोन सापांची झुंज असो की त्यांची शिकार करण्याची पद्धत कायमच नेटकऱ्यांना भावते. पण काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तुम्ही कधी पाय असलेला साप पाहिला आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. जर तुम्हालाही ही बातमी खोटी वाटत असेल, तर आधी हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओत साप चक्क चालताना दिसत आहे.
एनेल पॅन नावाच्या युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ लिंक शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये एका इंजिनिअरने डोकं लावून असा जुगाड लावला आहे. यामुळे आता सापालाही पायावर चालता येणार आहे. व्हिडीओच्या शेवटी साप यंत्राच्या साहाय्याने पायांनी कसा चालतो हे दाखवण्यात आले आहे.
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकीत झाले आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.