मुंबई : Apple AirTags: एक धक्कादायक बातमी. आपल्या गर्लफ्रेंडसोबत 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला होता. मात्र, त्याचे नाते तुटल्यानंतर माजी प्रेयसीची (Ex-Girlfriend) हेरगिरी करण्यासाठी त्याने असा काही जुगाड केली की तो पाहून तुम्ही हैराण व्हाल.
Apple AirTags च्या मदतीने, बदमाश नाहक त्रास देत आहेत. पाठलाग करुन लोकांचा छळ केला जात आहे. AirTag एक उत्तम अॅक्सेसरी आहे जी यूसर्स त्यांच्या वैयक्तिक वस्तू जसे की चाव्या, पर्स, सामान किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी मदत करते. किंबहुना, काही लोक चोरीला गेल्यास त्यांचा माग काढण्यासाठी ही अॅक्सेसरी कारमध्येही ठेवत आहेत. परंतु यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात अॅपल एअरटॅगचा वापर स्टॉकिंग डिव्हाइस म्हणून केला जात होता. अगदी अलीकडील प्रकरणात, ख्रिस्तोफर पॉल ट्रॉटमॅन या यूकेच्या व्यक्तीने आपल्या माजी मैत्रिणीचा पाठलाग करण्यासाठी Apple AirTag चा वापर केला.
डेली मेलच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने पीडितेला सतत कॉल आणि प्रश्न विचारुन त्रास दिला आणि त्यानंतर तिच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेण्यासाठी अॅमेझॉनचा एअरटॅग तिच्या कारला जोडला. Apple AirTag आपल्या स्थानावर प्रवेश करण्यासाठी iPhone शी जोडले केले जाऊ शकते.
काय आहे हा प्रकार?
स्वानसी क्राउन कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान स्वानसी येथील ग्विनेड एव्हेन्यूच्या ट्रॉटमॅनने पीडितेचा कसा आणि का छळ केला हे उघड झाले. अहवालात नमूद केले आहे की 10 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये त्याचे तिच्याशी ब्रेकअप केले. त्यानंतर, त्याने महिलेला तिच्या ठावठिकाणाविषयी अनावश्यक प्रश्न विचारले आणि तिला पबमध्ये नोकरी सोडण्यासाठी पैसे देऊ केले. नंतर, त्याने तिच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेण्यासाठी Apple AirTag ट्रॅकर वापरला.
मार्च 2022 मध्ये, पीडितेला तिच्या आयफोनवर एक सूचना मिळाली की, ती तिच्या कारमध्ये बसलेली असताना Apple AirTag शी कनेक्ट झाली होती. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले असले तरी नंतर तिला ट्रॉटमनचा मेसेज आल्यावर हा काय प्रकार आहे तो समजला. त्याने तिला नेमके ठिकाण सांगितले आणि ती कुठे आहे हे त्याला कसे कळले, याचा ती विचार करु लागली. त्यावेळी तिला ते कळले नाही. जेव्हा तिच्या मुलीला एअरटॅगबद्दल सूचना मिळू लागल्या तेव्हा तिला या समस्येबद्दल समजले. नंतर, पीडित व्यक्तीला कारच्या मागील बंपरच्या खाली असलेल्या पोकळीत एअरटॅग चिकटवलेला आढळला.
तिने पोलिसांशी संपर्क साधला आणि ट्रॉटमॅनच्या अॅमेझॉन अकाऊंटा शोध घेतला असता असे दिसून आले की, त्याने गेल्या काही महिन्यांत Apple AirTag अनेक एअरटॅग खरेदी केले होते; धक्कादायक म्हणजे, त्याची प्रथम मुलाखत घेण्यात आली आणि त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. मात्र साक्षीदाराला धमकावण्याच्या आरोपाखाली पुन्हा अटक करून रिमांड झाली. स्वानसी क्राउन कोर्टात ट्रॉटमॅनला नऊ आठवडे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.