दक्षिण आफ्रिकेत रेल्वे - ट्रक अपघातात १८ ठार, २४५ जण जखमी

दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी रेल्वे आणि ट्रक अपघातात १८ जण ठार झालेत तर २४५ लोक जखमी झालेत. ट्रक रेल्वे पटरी पार करताना हा अपघात झाला. यावेळी आग लागली. या आगीत अनेक प्रवासी होरपळेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 5, 2018, 05:00 PM IST
दक्षिण आफ्रिकेत रेल्वे - ट्रक अपघातात १८ ठार, २४५ जण जखमी title=
छाया सौजन्य - एपी

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी रेल्वे आणि ट्रक अपघातात १८ जण ठार झालेत तर २४५ लोक जखमी झालेत. ट्रक रेल्वे पटरी पार करताना हा अपघात झाला. यावेळी आग लागली. या आगीत अनेक प्रवासी होरपळेत.

ट्रक चालकाचा बेफीकीरपणा

रेल्वे येत असताना ट्रक चालकाने रेल्वे फाटकातून ट्रक पटरीवरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी ट्रकने रेल्वेला पटरीवर धडक दिली आणि हा अपघात झाला. रेल्वे जवळ आल्यानंतरही चालकाने आततायीपणा करत ट्रक रेल्वे पटरी पार करण्यासाठी चालवला. मात्र, तोपर्यंत रेल्वे जवळ आली आणि ट्रकने रेल्वेलाच धडक दिली.

या अपघातानंतर रेल्वेचे डब्बे रुळावरुन घसल्याने मोठा अपघात झाला. रेल्वेतील २५४ लोक जखमी झालेत तर १८ लोकांचा जीव गेला. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रक चालकाने बेपर्वाई दाखवत ट्रक पटरीवर नेला. त्यामुळे हा अपघात झाला.