...अखेर श्रीलंकेचं हंबनटोटा बंदर चीनच्या ताब्यात !

श्रीलंकेने देशाच्या दक्षिणेला असलेलं हंबनटोटा बंदर चीनच्या हवाली केलं आहे.

Updated: Dec 9, 2017, 08:09 PM IST
...अखेर श्रीलंकेचं हंबनटोटा बंदर चीनच्या ताब्यात ! title=

कोलंबो : श्रीलंकेने देशाच्या दक्षिणेला असलेलं हंबनटोटा बंदर चीनच्या हवाली केलं आहे.

99 वर्षांचा भाडेतत्वाचा करार

श्रीलंकेने हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांच्या भाडेतत्वाच्या करारावर दिलं आहे. हंबनटोटा इंटरनॅशनल पोर्ट गृप आणि हंबनटोटा इंटरनॅशनल पोर्ट सर्विसेस या दोन चीनी कंपन्या आणि श्रीलंका पोर्ट ऑथोरिटी यांच्या अखत्यारीत बंदर आणि त्याच्या आजूबाजूचा गुंतवणुक असलेला पट्टा येणार आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रणील विक्रमसिंगे यांनी त्यांच्या चीन दौऱ्यात  यासंदर्भातल्या करार पूर्णत्वास नेला. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष महींदा राजपक्सा यांचंच धोरण पुढे नेलं आहे. 

श्रीलंकेला मोठी आर्थिक मदत

चीनने श्रीलंकेला 8 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलयं.
यातून श्रीलंकेच्या या भागात इकॉनॉमिक झोन तयार केले जातील तसच औद्योगिक विकास केला जाईल. यातून आर्थिक विकासाबरोबरच पर्यटनात वाढ साधली जाईल. चीनने आपल्या बेल्ट अॅन्ड रोड इनिशिएटीवचा भाग असलेल्या सागरी रेशीम मार्गाच्या योजनेअंतर्गत श्रीलंकेमध्ये प्रचंड गुंतवणुक केली आहे.

चीनचा मुत्सद्दीपणा

त्याचाच एक भाग म्हणून चीनने श्रीलंकेला मोठं कर्ज दिलं आहे. यातून हंबनटोटा बंदराचा विकास, पायाभूत सोयी सुविधांची उभारणी केली जातेय. यामुळे श्रीलंकेला विकास करण्याची संधी मिळतेय तर चीनला हिंद महासागरात मोक्याच्या जागी असलेलं हंबनटोटा बंदर व्यापारासाठी वापरता येणार आहे. या परिसरात श्रीलंकेने चीनला प्रचंड करसवलत दिली आहे. त्याचबरोबर या बंदराचा नौदलाचा तळ म्हणून वापर करण्याचा चीनचा डाव आहे.

भारतासमोरचं प्रचंड लष्करी आव्हान

आपल्या शेजारीच चीन अशी ठाण मांडून बसल्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतासमोर मोठंच आव्हान उभं राहिलं आहे. यापूर्वी उत्तरेकडून आणि पूर्वेकडून चीनचा धोका आणि आक्रमण होतंच आता तो दक्षिणेतूनसुद्धा निर्माण झाला आहे.