अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, ८ ठार

अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 8 जण ठार, तर 15 जण जखमी झालेत. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 23, 2017, 11:05 PM IST
अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, ८ ठार title=

काबूल : अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 8 जण ठार, तर 15 जण जखमी झालेत. 

नानगरा प्रांताची राजधानी असलेल्या या शहरात अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हल्लेखोरानं स्फोट घडवला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी सभा सुरू असतानाच हा प्रकार घडला. 

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नसली तरी मुख्य संशय तालिबानवर व्यक्त केला जातोय.