Sunita Williams Video : कैक महिने, किंबहुना वर्षभराहून अधिक काळासाठीसुद्धा अवकाशात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य नेमकं कसं असतं याविषयी कायमच अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं आहे. अंतराळवीर अंघोळ कशी करतात, ते जेवतात काय, त्यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो, ते झोपतात कसे? असे एक ना अनेक प्रश्न फक्त लहानांच्याच नव्हे, तर मोठ्यांच्याही मानात घर करताना दिसतात. असाच एक प्रश्न म्हणजे अंतराळवीर पाणी कसं पितात?
एका शालेय विद्यार्थिनीला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर खुद्द नासाच्या अंतराळवीर, सुनीता विलियम्स यांनीच एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिलं आणि या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याचाच तर, व्हिडीओ; मग व्हायरल का होतोय? तर.... अंतराळात पाणी पिणं म्हणजे एखाद्या कसरतीहून कमी नाही, हेच इथं पाहायला मिळत आहे.
एलिमेंट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांशी व्ह्यर्चुअली संवाद साधताना सुनीता विलियम्स यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर ही मंडळी कशी वास्तव्य करतात, त्यांच्यापुढं कोणकोणती आव्हानं असतात यासंदर्भातील माहिती दिली. गुरुत्वाकर्षण कमालीचं कमी असतानासुद्धा कशा पद्धतीनं द्रव पदार्थ अर्थात पाणी, ज्यूस वगैरे प्यायला जातो याची माहिती त्यांनी सउहादरण दिली.
ISS वर द्रव पदार्थ कायमच वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे गुमधर्म दाखवतात. ज्यामुळं तिथं पृथ्वीप्रमाणं ग्लास किंवा कपातून पाणी पिणं शक्य नसतं. परिणामी अंतराळवीर तिथं पाणी पिण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबतात. पाण्यासाठी या अंतराळवीरांकडे एक लहानसा बाटलीवजा पाऊच असतो. गुरुत्वाकर्षण कमी असणाऱ्या किंवा अगदीच गुरुत्वाकर्षण नसणाऱ्या ठिकाणी द्रव पदार्थ वाहून जाऊ नये यासाठीच हे पाऊच तयार करण्यात येतात. याच पाऊचमध्ये असणारं पाणी नेमकं कसं प्यावं? हेसुद्धा विलियम्स यांनी या शालेय विद्यार्थिनीला दाखवलं.
A student gets a demonstration from astronaut, Sunita Williams on how to drink liquids in space. Williams and Barry "Butch" Wilmore hit the six-month mark in space after becoming the first to ride Boeing's new Starliner capsule on what was supposed to be a week-long test flight.… pic.twitter.com/1UQSgvcHsN
— Francynancy (@FranMooMoo) December 6, 2024
व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार ज्या क्षणी या पाऊचमधून विलियम्स पाणी बाहेर काढतात तेव्हा पाण्याचा एक मोठाला थेंब तरंगू लागतो आणि तो थेंब पिण्यासाठी सुनीता विलियम्ससुद्धा एक उसळी घेऊन बरोबर तो पिऊन दाखवतात. पाण्यासाठीचा हा आटापिटा पाहताना विद्यार्थ्यांनाही धक्काच बसला.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.