घर सोडून गेलेल्या इसमाच्या मृतदेह दहा वर्षांनी सापडला

 १० वर्ष एका व्यक्तीचा मृतदेह एका सुपरमार्केटमध्ये पडून...

Updated: Jul 27, 2019, 05:04 PM IST
घर सोडून गेलेल्या इसमाच्या मृतदेह दहा वर्षांनी सापडला  title=

आयोवा : अमेरिकेतील आयोवा शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथल्या एका सुपरमार्केटमध्ये फ्रीजरच्यामागे एक मृतदेह आढळला. हा मृतदेह १० वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. फ्रिजरमागे १८ इंचाच्या गॅपमध्ये हा मृतदेह होता. विशेष म्हणजे या प्रकरणाबद्दल कोणाला काही थांगपत्ता नव्हता. लॅरी एली मुरिलो-मोनकाडा असे त्या मृत इसमाचे नाव आहे. 

लॅरी हा सुपरमार्केटमध्ये काम करत होता. घरगुती भांडणाला कंटाळून नाराज झालेल्या लॅरीने २८ नोव्हेंबर २००९ ला घर सोडले ते कायमचेच. लॅरीच्या घराच्यांनी याबद्दल पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी त्याची खूप शोधाशोध केली मात्र तो कुठेच सापडला नाही. 

ज्यावेळी लॅरी बेपत्ता झाला तेव्हा त्यांचे वय २५ वर्ष होते. लॅरी बेपत्ता झाल्याच्या १० वर्षांनी तो काम करत असलेल्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांना एक मृतदेह सापडला.स्टोरच्या फ्रीजरमागे एक कुजलेला मृतदेह पाहून कर्मचारी आवाक झाले. दुर्देवाने तो लॅरीचा मृतदेह होता. दोन वर्षांपुर्वी हे सुपरमार्केट बंद झाले होते. त्यामुळे इथे कोणी पोहोचण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बेपत्ता झालेला लॅरी इथे सापडू शकतो असे कोणाला वाटले नव्हते. 

मृतदेह सापडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलीसांना पाचारण केले.  पोलीसांनी या प्रकरणाबद्दल वेगवेगळे अंदाज लावले असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. पोलीसांच्या अंदाजानुसार लॅरी स्टोरमध्ये आला असावा आणि त्याने फ्रीजच्या टॉपवर चढण्याचा प्रयत्न केला असेल. पण लॅरीचा तोल गेला असावा आणि तो घसरून गॅपमध्ये पडला असावा. त्यावेळी लॅरी ओरडला असेल मात्र मशीनच्या आवाजामुळेही त्याचा आवाज दाबला गेला असावा. असा अंदाज पोलीसांनी त्यांच्या चौकशी दरम्यान लावला. असे असले तरीही लॅरी तिथे कसा पोहोचला ? इतक्या दिवसांत त्याच्या मृतदेहाची दुर्गंधीही कोणाला आली नाही का ? असे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.