दुसरा बरम्यूडा ट्रँगल भारताच्या अगदी जवळ... असे ठिकाण ज्याचे पुस्तकात अस्तित्व तर आहे, पण ते अस्तित्वात नाही...

येथे वेळ थांबते आणि लोकं जेव्हा पाहिजे तोपर्यंत येथे जगू शकतात.

Updated: Jul 19, 2021, 06:55 PM IST
दुसरा बरम्यूडा ट्रँगल भारताच्या अगदी जवळ... असे ठिकाण ज्याचे पुस्तकात अस्तित्व तर आहे, पण ते अस्तित्वात नाही...  title=

मुंबई : तुम्हाला तर माहितच आहे की, आपले जग हे सगळ्या आश्चर्यकारक रहस्यांनी परिपूर्ण आहे. जगातील अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, ज्याचे काही तरी रहस्य असते आणि रहस्यमय गोष्टी कोणाला ऐकायला आवडत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला आज अशा एका रहस्याबद्दल सांगणार आहोत. तुम्ही बरम्यूडा ट्रॅंगलबद्दल ऐकलेच असणार. तेथे गेलेली कोणतीच व्यक्ती परत येत नाही. त्याच प्रमाणे भारताच्या जवळ असा एक भाग आहे जी जागा अस्तीत्वात तर आहे परंतु तिचे अस्तीत्व कोणालाही जाणवत नाही. या जागेचे नाव आहे'शांगरी-ला व्हॅली' (Shangri-La valley).

ते एक रम्य ठिकाण

लोकांचे शांगरी-ला व्हॅली (Shangri-La valley) याबद्दल असे मत आहे की, येथे वेळ थांबते आणि लोकं जेव्हा पाहिजे तोपर्यंत येथे जगू शकतात. त्यामुळे जगभरातील बर्‍याच लोकांनी या शांगरी-ला व्हॅलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. कारण आजपर्यंत हे शोधण्यात कोणालाही यश आले नाही.

प्रख्यात तंत्र साहित्य लेखक अरुण कुमार शर्मा यांनीही ‘तिब्बत की वह रहस्यमय घाटी’ या पुस्तकात या जागेचा उल्लेख केला आहे. परंतु ही व्हॅली नक्की कुठे आहे हे काही सांगण्यात आलेले नाही.

त्यांच्या मते जगात अशा काही जागा आहेत, जिथे एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे अस्तित्व जगापासून नाहीसे होते.शांगरी-ला व्हॅलीही त्यांपैकी एक आहे. शांगरी-ला व्हॅलीही बर्म्युडा ट्रायंगलसारखीच असल्याचे म्हटले जाते.

तिबेटियन भाषेतील 'काल विज्ञान' या पुस्तकात देखील या व्हॅलीचा उल्लेख आहे. जेम्स हिल्टन नावाच्या लेखकानेही आपले पुस्त 'लॉस्ट हॉरायजन' या पुस्तकात या रहस्यमय जागेबद्दल लिहिले आहे.परंतु त्यांच्या मते ही एक काल्पनिक जागा आहे. तिबेटी विद्वान युत्सुंग यांच्या मते या दरीचा संबंध अंतराळातील वेगळ्या जगाशी आहे.

आध्यात्मिक क्षेत्र, तंत्र साधना किंवा तंत्र ज्ञानाशी संबंधित आहे अशी या व्हॅलीची ओळख आहे. त्यासाठी ती जग भरात प्रसिद्ध आहे. परंतु अद्याप अशा ठिकाणी कोणीही पोहचू शकलेले नाही.