हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही रस्त्याने चालताना शंभर वेळा कराल विचार...पाहा हा थरारक Video...

 सोशल मीडियावर आजपर्यंत येवढा भीषण आणि थरारक अपघात आपण पाहिला नसेल. हा व्हिडीओमधील अपघात पाहून यूजर्सचा जीव हादरला आहे. 

Updated: Jul 23, 2022, 03:13 PM IST
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही रस्त्याने चालताना शंभर वेळा कराल विचार...पाहा हा थरारक Video... title=

Viral Video: सोशल मीडियावर अनेक भयानक आणि भीषण अपघाताचे व्हिडीओ तुम्ही बघितले असाल. काही अपघात इतके भीषण असतात ते पाहिल्यावर अनेक रात्र आपल्याला झोप लागत नाही. सध्या सोशल मीडियावर जो अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकते. 10 सेकंदचा हा व्हिडीओ आपल्याला अस्वस्थ करुन सोडतो. सोशल मीडियावर आजपर्यंत येवढा भीषण आणि थरारक अपघात आपण पाहिला नसेल. हा व्हिडीओमधील अपघात पाहून यूजर्सचा जीव हादरला आहे. 

थरारक व्हिडीओ

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक SUV रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कारला मधोमध चिरून निघून जाते. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण निशब्ध होऊन जाता. हा व्हिडीओ पाहून एकच लक्षात येतं रस्त्यावरुन चालतानाही आपल्याला सावध राहायला हवं. रस्त्यावरुन चालतानाही कुठल्या क्षणी यमराज तुमची वाट पाहत असेल ते तुम्हालाही माहिती नसतं. व्हिडीओमध्ये दिसतंय की रस्त्यावर ट्रॅफिक आहे. अशात एक भरधाव वेगान SUV येते आणि रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दोन गाड्यांना धडक देते. ही टक्कर इतकी जोरदार असते की SUV या गाड्यांना चिरून निघून जाते. या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, या SUVच्या धडकेत गाड्या चक्काचूर झाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे ते समजू शकलं नाही. 

रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना काही समजण्यापूर्वी SUVने कहर केला असतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अपघातात कारचे एक एक पार्ट हवेत उडताना दिसत आहेत. एखाद्या चित्रपटातील दृष्य असावा असा हा अपघात आहे. या अपघाताच्या वेळी रस्त्यावरून जाणारे आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना हा अपघाताचा थरार पाहून त्यांचे हौश उडाल्याचं दिसत आहे. भीषण अपघाताचा हा व्हिडीओ ट्विटरवर Accidentologia या नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.