ABCD शिकवण्यासाठी शिक्षकानं वापरली 'आयडियाची कल्पना'! मजेशीर Video Viral

Teacher Viral Video: चांगल्या समाजासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं असतं. ज्ञानार्जनातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. चांगले विद्यार्थी भविष्य घडवतात. म्हणून समाजात शिक्षक भूमिका महत्त्वाची ठरते. असाच एक शिक्षक भावी पिढी घडवत आहे.

Updated: Oct 27, 2022, 04:02 PM IST
ABCD शिकवण्यासाठी शिक्षकानं वापरली 'आयडियाची कल्पना'! मजेशीर Video Viral title=

Teacher Viral Video: चांगल्या समाजासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं असतं. ज्ञानार्जनातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. चांगले विद्यार्थी भविष्य घडवतात. म्हणून समाजात शिक्षक भूमिका महत्त्वाची ठरते. असाच एक शिक्षक भावी पिढी घडवत आहे. वर्गातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. शिक्षकाची शिकवण्याची (Teacher Teaching Viral Video) पद्धत पाहून नेटकरीही खूश झाले आहे. नेटकरी शिक्षकाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ kidsrkidsmableton इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मिस्टर ब्रायनसोबत डान्स पार्टी!'

किड्स आर किड्स लर्निंग अॅकेडमी ऑफ मॅबलटन शाळेतील हा व्हिडीओ आहे. लहानग्यांना इंग्रजीतील अल्फाबेट्स शिकवताना शिक्षक नाचताना दिसत आहे. वर्गात बसलेले विद्यार्थीही अशा शिक्षणामुळे आनंदी झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ मागच्या महिन्यात पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओखाली नेटकरी आपल्या अंदाजात प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Trending: या व्यक्तीनं आपल्या डोळ्यात लावली Flash Light! कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

एका युजर्सने लिहिलं आहे की, "अशा शिक्षणामुळे शिक्षक कायमस्वरुपी लक्षात राहातात. खरंच अशा शिक्षकाचं कौतुक." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "मिस्टर ब्रायन यांच्या शिक्षणाचे धडे घेत असलेले विद्यार्थी खरंच लकी आहेत. मला सुद्धा त्यांच्याकडून शिकायला आवडेल."