US Man Turns His Eye Into A Flashlight: 33 वर्षीय व्यक्तीनं आपल्या डाव्या डोळ्यात फ्लॅश लाइट लावल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीनं आय-कॅचिंग इनोव्हेशन (Eye-Catching Innovation) केलं आहे. कँसरमुळे एक डोळा गमावलेल्या ब्रायन स्टेनली (Brian Stanley) यांनी हा कृत्रिम डोळा तयार केला आहे. इंजिनिअरनं निकामी झालेला डोळा फ्लॅश लाइटमध्ये कन्व्हर्ट केला आहे. गॅजेट गीक आणि इनोव्हेटरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही हेडलॅम्पप्रमाणे डोळ्यातून प्रकाश बाहेर पडतो. याबाबतचा डेमो त्यांनी व्हिडीओमध्ये दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दोन दिवसात या व्हिडीओला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
टायटेनियम स्कल लँपमुळे (Titanium Skull Lamp) अंधारात वाचण्यासाठी मदत होणार आहे. ही लाइट गरम होत नाही आणि बॅटरी लाइफ 20 तासापर्यंत असते, असं ब्रायन स्टेनली यांनी सांगितलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "अद्भुत..खरंच छान कल्पना आहे. मॅड मिमिर फ्रो गॉड ऑफ वॉरचा फील येतो." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे का, "कल्पनाशक्तिला खरंच सलाम..यामुळे भविष्यात आणखी नवे मार्ग सापडतील."
ब्रायन स्टेनली यांनी सायबोर्ग डोळा बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी 'टर्मिनेटर' चित्रपटातील अर्नॉल्ड श्वार्झनेगरच्या पात्राप्रमाणेच एक कृत्रिम डोळा तयार केला होता.