S** जणू त्याच्यासाठी व्यसन... ; सुंदर तरुणी होत्या 'या' हुकूमशहाच्या Bodyguard

दहशतवादाला खातपाणी घालणं आणि या कारवायांमध्ये सहभागी होण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. 

Updated: Sep 23, 2022, 04:12 PM IST
S** जणू त्याच्यासाठी व्यसन... ; सुंदर तरुणी होत्या 'या' हुकूमशहाच्या Bodyguard title=
there was a team of famale bodyguards for security of muammar gaddafi

World News : जगभरात आजवर जितके हुकूमशहा झाले, त्या प्रत्येकाच्याच नावानं काहींचा थरकाप उडवला, तर काहींना नि:शब्द केलं. अतिशय विक्षिप्त आणि सूडबुद्धीनं यातल्या काही हुकमशहांनी सत्ता बळकावली. अधिपत्याखाली असणाऱ्यांवर त्यांनी अत्याचार केले, इतके की ऐकून डोळे गच्च मिटून घ्याल. अशाच हुकूमशहांपैकी एक म्हणजे कर्नल मुअम्मर गद्दाफी (muammar gaddafi). (Terrorism) दहशतवादाला खातपाणी घालणं आणि या कारवायांमध्ये सहभागी होण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. 

2011 मध्ये लिबियात (libya) झालेल्या उठावामध्ये गद्दाफीची सत्ता कोलमडली होती. असं असलं तरीही सत्तेत असताना मात्र त्याची बरीच दहशत पाहायला मिळाली होती. पाश्चिमात्य देशाचं आर्थिक वर्चस्व हाणून पाडण्याकडे गद्दाफीचा कल होता. 

गद्दाफी काही बाबतीत प्रचंड विक्षिप्त होता असं म्हणायला हरकत नाही. स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी तो प्रमाणाहून जास्त घेताना दिसत होता. शौक बडी चीज है... असं म्हणतात ते गद्दाफीच्या राहणीमानाकडे पाहून लक्षात येत होतं. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी महिला अंगरक्षकांवर होती. हा ताफा संपूर्ण जगभर चर्चेत आला होता. 

अधिक वाचा : बाबो... 1300 वर्षांपूर्वीचा खजिना जगासमोर, पाहा कसं दिसतं अस्सल सोनं

Muammar Gaddafi | Zee News

अॅमेझोनियन गार्ड, अशी त्याच्या महिला अंगरक्षकांची ओळख होती. जगभरातील माध्यमांमुळेच त्यांना हे नाव मिळालं होतं. Bodygaurds ची निवड खुद्द गद्दाफीच करत होता. जिथं लिबियामध्ये महिला हिजाबाशिवाय वावरत नव्हत्या, तिथं या गार्ड्स मात्र मेकअप, High Heels आणि दागिन्यांनी मढलेल्या असायच्या. 

या महिलांना Marshal arts, Weapon training आणि इतरही प्रशिक्षण दिलं जात होतं. पुढे गद्दाफी एकाएकी दिसेनासा झाला त्यावेळी त्याच्या याच ताफ्यातील काही महिला अंगरक्षकांपैकी काहींनी आपल्यावर गद्दाफी आणि त्याच्या मुलांनी अत्याचार केल्याचं सांगितलं. अनेकदा वीस जणं, काही वेळेस कुटुंबीयांसमोरच त्यांच्यावर हे प्रसंग ओढावले होते. ही क्रूर परिस्थिती ऐकतानाही मन विषण्ण होतं. 

असं म्हणतात की गद्दाफीसाठी S@# म्हणजे एक व्यसन होतं. जवळपास 40 वर्षे त्यानं लिबियावर राज्य केलं. त्याच्या मृत्यूपश्चातच हे हादरवणारं वास्तव जगासमोर आलं होतं.