हा तर कुंभकर्णी अवतार.. खाण्याच्या शर्यतीत रचतोय एकावर एक विक्रम

केवळ पाच मिनिटांत १४१ ओरिओ बिस्किटचे पुडे संपविणे असो किंवा २८ मिनिटांत ३०० स्प्राउट्स खाणे असे एकापेक्षा एक सरस विक्रम करणाऱ्या मॅक्सने आणखी एक नवा विश्वविक्रम केलाय.   

Updated: May 25, 2022, 07:49 PM IST
हा तर कुंभकर्णी अवतार.. खाण्याच्या शर्यतीत रचतोय एकावर एक विक्रम title=

लंडन : लंडनमध्ये राहणारा मॅक्स स्टॅनफोर्ड हा कुंभकर्णाचा दुसरा अवतार म्हटलं तर वावगं ठरू नये. खाण्याच्या शर्यतीत हा असामी एकावर एक विक्रम रचत आहे. नुकताच त्याने खाण्याच्या बाबतीत आणखी एक अनोखा विश्वविक्रम केलाय.

केवळ पाच मिनिटांत १४१ ओरिओ बिस्किटचे पुडे संपविणे असो किंवा २८ मिनिटांत ३०० स्प्राउट्स खाणे असे एकापेक्षा एक सरस विक्रम करणाऱ्या मॅक्सने आणखी एक नवा विश्वविक्रम केलाय. 

डेझर्ट म्हणून कमी अधिक प्रमाणात खाल्ले जाणारे जाफा केकचे ८८ तुकडे त्याने अवघ्या तीन मिनिटात खाऊन संपवले. हा विक्रम करण्यासाठी मॅक्सने सरासरी दोन सेकंदात एक जाफा केक खाल्ला. हा केक घशातून खाली जाण्यासाठी तो गरम पाणी पित राहिला.

या वेगाने मॅक्स याने अत्यंत वेगात म्हणजेच केवळ तीन मिनिटांत ८८ जाफा केक सहा ग्लास गरम पाण्यासोबत अक्षरशः गिळले. त्यांचा हा वेग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले होते. मात्र, खाण्याचा हा वेग पाळायचा असेल तर त्यासाठी विशेष प्रशिक्षण घेणं आवश्यक असल्याचं मॅक्सनं म्हटलंय.