बायको विकणे आहे ! नवऱ्याची सोशल मीडियावर जाहिरात; खरेदीदारांचा प्रतिसाद पाहून...

 नवऱ्याने थेट बायकोच विकायला काढल्याची जाहिरात केलीय. त्याची ही जाहिरात पाहून संपूर्ण कुटूंब चक्रावले आहे. 

Updated: May 25, 2022, 05:01 PM IST
बायको विकणे आहे ! नवऱ्याची सोशल मीडियावर जाहिरात; खरेदीदारांचा प्रतिसाद पाहून...   title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेकदा आपण एखादी जुनी अथवा आपल्या गरजेची नसलेली वस्तु विकायला काढत असतो. मात्र या घटनेत काही भलतंच घडलंय. नवऱ्याने थेट आपली बायकोच विकायला काढल्याची जाहिरात केलीय. त्याची ही जाहिरात पाहून संपूर्ण कुटूंब चक्रावले आहे. तर या जाहिरातींवर खरेदीदारांनी तुफान प्रतिसाद दिलाय. 

रॉबी मॅकमिलन आणि सारा हे ब्रिटनमधलं विवाहीत जोडपं आहे. एकदा पत्नी सारा सुट्टी घेऊन मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. यावेळी रॉबीने थेट सोशल मीडियावर (Wife For Sale) बायकोला विकण्याची जाहिरात पोस्ट केली. 

रॉबीने नुसती जाहीरातचं काढली नाही तर तिच्या चांगल्या वाईट गुणांचीही माहिती दिली. रॉबीने बायकोची एका कारशी तुलना करत तिच्यातल्या फिचर्सची माहिती या जाहिरातीत जोडली. विशेष म्हणजे या माहितीसोबत पत्नी साराचा फोटो देखील शेअर केला. रॉबीने केलेल्या पोस्टला शेकडो लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स आल्या आहेत. 

जाहिरातीवर नवरा काय म्हणाला ? 
आम्ही जवळपास 20 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत आहोत. आम्हाला एकमेकांची चांगली सवय झालीय. जाहिरातीनंतर मला साराच्या विक्रीच्या अनेक ऑफर आल्या आहेत, मात्र ती कधीच विक्रीसाठी नाही, ती लाखात एक असल्याची रॉबीने म्हटले आहे.  

जाहिरातीवर पत्नी काय म्हणाली ? 
रॉबी मॅकमिलन आणि सारा या दोघांना दोन मुले आहेत. दोघांचा चांगला सुखी संसार आहे. यामध्ये पत्नी साराने देखील कमेंट केली आहे. सारा म्हणाली, मी पोस्ट पाहिल्यावर मला खुप हसू आले. रॉबी खूप चंचल आहे. मस्करी करण्यात तो पुढे असतो.   तो नेहमी असेच काम करतो, असेही ती म्हणाली.  

दरम्यान रॉबीने काढलेली ही जाहिरात निव्वळ एक मस्करी होती. ही मस्करी सारा झेलू शकली पण इतर बायका झेलतील की नाही सांगता येत नाही.