अबब! 'ही' आहे जगातली सर्वात उंच तरुणी; कर्तृत्वंच नाही तिची उंचीही जगात भारी

समाजात वावरताना आपल्याला एक ओळख निर्माण करावी लागते. पण काही लोकांची ओळख भलत्याच कारणांवरून असते.

Updated: Sep 23, 2022, 12:08 PM IST
अबब! 'ही' आहे जगातली सर्वात उंच तरुणी; कर्तृत्वंच नाही तिची उंचीही जगात भारी title=
This is the tallest young woman in the world

World News : समाजात वावरताना आपल्याला एक ओळख निर्माण करावी लागते. पण काही लोकांची ओळख भलत्याच कारणांवरून असते. अशीच एक तरुणी जगात तिच्या उंचीमुळे ओळखली जाते. ही तरुणी कोण आहे? ती राहते कुठे? ती इतकी उंच कशी?, तिच्या उंचीला आतापर्यंत मिळालेली बक्षिसे कोणती? असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथेच मिळणार आहेत. (This is the tallest young woman in the world)

ही तरुणी कोण आहे आणि राहते कुठे?
जगातील सर्वात उंच तरुणी होण्याचा मान तुर्की येथील २४ वर्षीय तरुणीने मिळवला आहे. रुमेयसा गेलगी (Rumeysa Gelgi) असे तिचे नाव असून तिची उंची ७ फूट०.७ इंच म्हणजेच २१५.१६ सेंटीमीटर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या रिपोर्टनुसार रुमेसा गेलगी ही जगातील सर्वात उंच (हयात) तरुणी आहे.

आणखी वाचा... बाबो... 1300 वर्षांपूर्वीचा खजिना जगासमोर, पाहा कसं दिसतं अस्सल सोनं

ती इतकी उंच कशी?
रुमेयसा गेलगी या तरुणीला विव्हर सिंड्रोम (Weaver syndrome) हा आजार आहे. ती सामान्य जीवन जगू शकत नाही. हा एक दुर्मीळ आजार असून यामध्ये तुमची वाढ वेगाने होते. तिला चालण्यासाठी व्हीलचेअर किंवा वॉकिंग फ्रेमचा आधार घ्यावा लागतो. अशाप्रकारचा जेनेटीक आजार (Genetic disease) असणारी मी तुर्कीतील एकमेव मुलगी आहे असे रुमेसेया म्हणते.  

तिच्या उंचीचा आतापर्यंत नोंदवलेला विक्रम
विशेष गोष्ट म्हणजे 2014 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी रुमेयसाच्या नावावर सर्वात उंच किशोरवयीन मुलगी असा विक्रम नोंदविण्यात आला होता. 2021 मध्ये दुसऱ्यांदा तिचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Record) नोंदविण्यात आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेन्डे म्हणाले की, रुमेसाचे रेकॉर्ड बुकमध्ये पुन्हा स्वागत करणे हा सन्मान आहे. त्यांचे आयुष्य हे सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रुमेयसा म्हणते की, कुटुंबियांकडून त्यांना चांगलाच पाठिंबा मिळाला आहे. 

रुमेयसा म्हणाली, 'मी उंच आहे हे माझं नुकसान नाही तर हा माझा फायदा आहे'. प्रत्येक नकारात्मक गोष्ट सकारात्मकतेत कशी बदलता येईल याचा जर सगळ्यांनी विचार केला तर हे जग खूप सुंदर होईल. रुमेयसा पुढे म्हणाली, प्रथम तुम्ही तुमचा स्वीकार करा, स्वत:ला कमी लेखू नका, तुमच्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि शक्य तितके प्रयत्न करत रहा. 

रुमेयसाच्या वाक्यांमध्ये आयुष्य जगण्याचे गुपित दडले आहे. आपण नेहमी ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्यासाठी रडत असतो पण आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद कसा व्यक्त करायचा हे आपल्याला रुमेयसाने शिकवले.

आणखी वाचा... Relationship tips: तुम्ही डेटला गेल्यावर या चुका करता का? चुका टाळण्याच्या सिक्रेट टिप्स