सापासारखे स्टॉकिंग्स घातलेल्या महिलेला मारहाण झाल्याची घटना असत्य

सापासारखे स्टॉकिंग्स घातलेल्या महिलेला मारहाण झाल्याची घटना असत्य

सापासारखे स्टॉकिंग्स घातलेल्या महिलेला मारहाण झाल्याची घटना असत्य

मुंबई : एका महिलेने सापासारखे स्टॉकिंग्स, म्हणजे लांब मोजे पायात घातले होते, ते पाहून तिच्या पतीने तिला मारहाण केली. कारण त्याला तिचे पाय सापासारखे दिसत होते. अशी बातमी यापूर्वी प्रकाशित झाली होती, ही बातमी फॅक्टचेकमध्ये असत्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. या बातमीत दिसणारा फोटो, हा दुसऱ्या एका वेगळ्या घटनेचा आहे, आणि सापासारखे मोजे घातलेले पाय असलेला फोटो हा वेगळ्या घटनेचा आहे. पाकिस्तानी कम्युनिटी इन ऑस्ट्रेलिया या फेसबूक पेजवरून ही असत्य घटना आणि फेक फोटो देण्यात आल्याचंही दिसून आलं आहे.

खाली घटना घडलेली नाही, ती असत्य असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आपल्या बाजूला अशा काही गोष्टी घडत असतात ज्यावर आपला विश्वासच बसत नाही. असाच एक विचित्र प्रकार ऑस्ट्रेलियात घडला आहे. पत्नीला पतीने एका विचित्र स्थितीत पाहिलं आणि त्याचा पाराच चढला. या रागातून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी होती की तिला तात्काळ रूग्णालयता दाखल करण्यात आलं. 

घडलं असं की, पत्नी बेडवर अशा अवस्थेत झोपली होती की, तिला पाहताच नवऱ्याचा पाराच चढला. आणि त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता बेदम मारहाण केली. 

फॅशनच्या वेडामुळे लोकं काय करतील याचा काही नेम नाही. पण हीच फॅशन एका महिलेला खूप महागात पडली आहे. या महिलेने सापासारखे स्टॉकिंग्स म्हणजे लांब मोजे घातले. आणि बेडवर झोपली होती. याच दरम्यान त्या महिलेचा नवरा रूममध्ये आला. 

पती जसा बेडरूममध्ये आला त्याला वाटलं की, बेडवर दोन साप आहेत. बेडवर साप पाहताच तो इतका घाबरला की त्याला काही सुचलंच नाही. मागचा पुढचा विचार न करता त्याने बेसबॅटने सापाला म्हणजे आपल्या पत्नीला मारहाण केली. 

त्याने साप समजून महिलेच्या पायालाच चांगली मारहाण केली. फोटोतही दिसतंय की, महिलेने पूर्ण पायातील मोजे घातले होते जे सापासारखे दिसत होते. 

म्हणजे बॅटने पत्नीच्या पायावर खूप मार दिले. या मारहाणीत पत्नी खूप जखमी झाली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 

फोटोत स्पष्ट दिसत आहे की, महिलेने घातलेले फोटो हे अगदी सापासारखे होते. त्यामुळे तिचा पतीच काय? तर कुणीही हे पाहिलं असतं तर त्याला देखील भीती वाटली असती. 

वरील घटना घडलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे...

वरील बातमी असत्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. या बातमीतले दोन्ही फोटो हे वेगवेगळया घटनांमधील आहेत, म्हणजे नवऱ्याने एखाद्या महिलेला सापाचे पाय समजून मारलं ही घटना असत्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे असत्य असल्याचं फॅक्टचेक फॅक्टक्रसेन्डोने समोर आणले आहे.