चीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा

चीनमध्ये आता राष्ट्रगीताचा अपमान केल्यास कडक कायदा पास करण्याचा विचार करत आहे. राष्ट्रीय विधीमंडळ राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा देण्याचा विचार करत आहे.

Updated: Oct 31, 2017, 05:12 PM IST
चीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा title=

नवी दिल्ली : चीनमध्ये आता राष्ट्रगीताचा अपमान केल्यास कडक कायदा पास करण्याचा विचार करत आहे. राष्ट्रीय विधीमंडळ राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षाची शिक्षा देण्याचा विचार करत आहे.

नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनसीपी) समितीने सोमवारी द्वि-मासिक सत्रामध्ये एक कायदा खासदारांपुढे ठेवला आहे. ज्यामध्ये राष्ट्रगीताचा अपमान केल्यास तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. तीन वर्षे शिक्षा यासाठी ठरवली जाणार आहे. औपचारिकपण राष्ट्रगीत वाजवण्याची परवानगी फक्त राजकीय बैठका, राष्ट्रीय खेळ, एनसीपी सत्र, शपथविधी, झेंडावंदन, मोठे कार्यक्रम, पुरस्कार समारंभ, स्मारक विमाचन, राष्ट्रीय मेमोरियल डे समारंभ, महत्वाचे राजकीय कार्यक्रम यावेळी दिली जाणार आहे.

याआधी फक्त ३ दिवसांची शिक्षा दिली जात होती. पण आता हा कायदा अजून कडक करण्यात येणार आहे. राष्ट्रगीत कोठेही वाजवण्यास परवानगी नसणार आहे. शब्दामध्ये बदल ही करता येणार नाही आहे. चुकीच्या पद्धतीने देखील त्याला वाजवता येणार नाही आहे.