क्रॉसिंग दरम्यान गाड्यांनी भरलेला ट्रक रेल्वेनं उडवला, पाहा थरारक व्हिडीओ

भरधाव रेल्वेची धडक, कारचा चुराडा...पाहा अपघाताची भीषणता दाखवणारा थरारक व्हिडीओ  

Updated: Oct 22, 2021, 09:55 PM IST
क्रॉसिंग दरम्यान गाड्यांनी भरलेला ट्रक रेल्वेनं उडवला, पाहा थरारक व्हिडीओ

मुंबई: अनेकदा रेल्वे क्रॉसिंगजवळ उभं राहू नये असं सांगितलं जातं. इतकच नाही तर रेल्वे क्रॉसिंग जीव धोक्यात घालून क्रॉस करू नये हे सांगून पण अनेक लोक ऐकत नाही. रेल्वे रुळाला अगदी जवळ गाडी थांबवल्याने ट्रक चालकाला मोठा फटका बसला आहे. इतकच नाही तर लाखो रुपयांचं नुकसान देखील झालं आहे. अंगावर शहारे आणणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की गाडीवर कारचा भार जास्त आल्याने गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे चालकाने गाडी सोडली. रेल्वे रुळावरून त्याचवेळेस ट्रेन आली. ट्रेननं या ट्रकला धडक दिली. लोकोमोटिव्ह यावेळी त्याला संदेश देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रेल्वेचा वेग जास्त होता. ट्रक आणि त्यावरील कारचा चुराडा झाला. 

हा अपघात खूप भयंकर होता. या व्हिडीओने अनेक प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. अपघातासाठी वापरकर्त्यांनी ट्रक चालकाबद्दल सहानुभूती व्यक्त केली. मला त्या माणसाची वेदना जाणवते. 28 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.