ब्रिटीश पालक भारतीय व्यंजनाच्या प्रेमात, मुलाचं नाव ठेवलं...

ब्रिटनमधील एका पालकाने मुलीचं जे नाव ठेवलं आहे ते ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.

Updated: Sep 4, 2022, 12:15 PM IST
ब्रिटीश पालक भारतीय व्यंजनाच्या प्रेमात, मुलाचं नाव ठेवलं... title=
treading news uk parents name their baby pakora Unique Child Names

Unique Child Names: आजकाल मुलांचं नाव काहीतरी हटके ठेवण्याचा खूप ट्रेंड आला आहे. आई-बाबा आपल्या नावाला घेऊन मुलाचं नाव ठेवतात. प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाचं नाव हे सगळ्यात यूनिक (Naming Ceremony)असावं. त्यासाठी अनेक रितसर घरातील मंडळीची मैफिल जमते आणि नावाचा शोध सुरु होतो. भारतीय संस्कृतीप्रमाणे गुरुजींकडून मुलाच्या नावाचे पहिले अक्षर काढले जाते. त्यानुसार मुलाचं नाव ठेवलं जातं. तर परदेशात मुलाच्या जन्माच्या वेळीच तुम्हाला नाव सांगावं लागतं. अशात ब्रिटनमधील एका पालकाने मुलीचं जे नाव ठेवलं आहे ते ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.

या मुलंच नाव सोशल मीडियावर व्हायरल  झालं आहे. ते ऐकून अनेक यूजर्सला तर हसू आवरत नाही आहे. आता तुम्ही म्हणाल अरे आम्हाला पण सांगा नेमकं काय नाव ठेवलं आहे, या मुलीचं. (treading news uk parents name their baby pakora Unique Child Names)

नाव आहे 'पकोडा'

ब्रिटिश पालकांना भारतीय पदार्थ (Indian Dish) पकोडा (Pakora)इतका आवडतो की त्यांनी चक्क आपल्या मुलाचं नाव पकोडा ठेवलं. सोशल मीडियावर त्याच्या मुलाचा फोटो आणि त्याच्याकडून पकोडे खरेदीचे बिल एकत्र व्हायरल होत आहे. यावर यूजर्स मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.आतापर्यंत 26 हजारांहून अधिक लोकांनी या ट्विटला लाइक केलं आहे. त्याच वेळी, 1500 हून अधिक लोकांनी ते रिट्विट केलं आहे

ब्रिटीश पालकांनी आपल्या मुलीचे नाव पकोडा ठेवल्याबद्दल प्रतिक्रिया देताना एका यूजर्सने लिहिले की, 'आणि तिच्या आजीचे नाव नान आहे'.

त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, मी माझ्या पुढच्या मुलाचं नाव लार्ज डोनर आणि चिप्स ठेवणार आहे.