ऐकावं ते नवलं! जुळ्या मुलांची आई एक मात्र वडील वेगळे, डॉक्टरही चक्ररावले

पण अशीच एक घटना समोर आली आहे, जी ऐकून नक्कीच तुमचं डोक चक्ररावून जाईल. एकाच आईच्या (Mother) पोटी जन्माला आलेल्या जुळ्या मुलांचे वडील (father) हे वेगवेगळे असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Updated: Sep 8, 2022, 03:32 PM IST
ऐकावं ते नवलं! जुळ्या मुलांची आई एक मात्र वडील वेगळे, डॉक्टरही चक्ररावले title=
Treading News woman gave birth twin with different dads

Twins with different DNA: जगात अनेक रहस्य घडामोडी असतात. विचित्र आणि विश्वास न बसणाऱ्या या गोष्टी अनेक वेळा आपलं डोकं चक्ररावून टाकतात. वैज्ञानिक आणि वैद्यकीय शास्त्राबद्दल बोलायचं झालं तर, अशा अनेक गोष्टी आहे त्याबद्दल आजही आपल्याला काही माहिती नाही. मग ते गर्भधारणेबद्दल असो किंवा गर्भधारणा झाल्यावर मुल एक आहेत की जुळी. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल डॉक्टरही काही ठोसपणे सांगू शकत नाहीत. 

पण अशीच एक घटना समोर आली आहे, जी ऐकून नक्कीच तुमचं डोक चक्ररावून जाईल. एकाच आईच्या (Mother) पोटी जन्माला आलेल्या जुळ्या मुलांचे वडील (father) हे वेगवेगळे असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. झालं असं की, 19 वर्षीय मुलीने जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र मुलांची डीएनए चाचणी झाली तेव्हा महिलेच्या आणि तिच्या जोडीदाराच्या पायाखालची जमीन सरकली. कारण एका मुलाचा डीएनए त्याच्या वडिलांच्या डीएनएशी जुळत होता पण दुसऱ्याचा नाही. मुलीच्या जोडीदाराला यावर विश्वास बसत नव्हता? (Treading News woman gave birth twin with different dads)

'डेली रेकॉर्ड'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या जोडप्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. हे प्रकरण पोर्तुगालमधील (Portugal) मिनेरोस सिटीचे आहे. खरं तर मेल पार्टनरला विश्वास होता की त्याची पार्टनर एकनिष्ठ आहे. तो म्हणाला की, 'संभाव्य गर्भधारणेदरम्यान मी तिच्यासोबत होतो. गरोदरपणात तिला कोणतीही समस्या झाली नाही. मुलं देखील पूर्णपणे निरोगी आणि एकसारखी आहेत. अशा परिस्थितीत आता मी दोन्ही मुलांचा बाप नसल्याचा खुलासा करणे थोडे विचित्र वाटतं आहे.'

नेमकं काय घडलं? 

डॉक्टरांच्या पॅनलने मुलीला बोलावून तिची सखोल चौकशी केली असता धक्कादायक प्रकार  समोर आला. त्या मुलीने सांगितले की, 8 महिन्यांपूर्वी तिचं दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध होते. या मुलीचं एकाच दिवसात दोन पुरुषांशी कमी अंतराने संबंध आला (having sex with two men on same day). या मुलीच्या सांगण्यावरून जेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीचा डीएनए करवून घेतला, तेव्हा त्याचा निकालही सकारात्मक आला. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या जुळ्या मुलांचे वडील वेगळे असूनही ही मुलं दिसायला एकसारखीच होती.

विश्वास तुटला पण सोडला नाही...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही मुलांच्या जन्म प्रमाणपत्रांवर अद्याप फक्त एकाच व्यक्तीचं नाव आहे. पण ते दोन्ही मुलांची समान काळजी घेतील असं या जोडप्याचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी या प्रकरणाला Heteropaternal Superfecundation असं नाव दिलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, संपूर्ण जगात आतापर्यंत अशी केवळ 20 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, या प्रकरणाचा अभ्यास करणारे डॉ. टुलिओ जॉर्ज म्हणतात की, ते या असामान्य दिसणार्‍या गर्भधारणेच्या तपशीलांचा अभ्यास करत आहेत.