Coronavirus Pandemic : कोरोना औषधांनी भारतीय लिव्हर कमकुवत?

कोरोना काळात (coronavirus pandemic) तुम्ही आम्ही अनेक औषधं (Medicine) घेतली.  

Updated: Sep 7, 2022, 08:44 PM IST
Coronavirus Pandemic : कोरोना औषधांनी भारतीय लिव्हर कमकुवत? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई  : कोरोना काळात (coronavirus pandemic) तुम्ही आम्ही अनेक औषधं (Medicine) घेतली. मात्र आता याच औषधांबाबत लॅन्सेटनं एक धक्कादायक दावा केलाय. भारतात अँटीबायोटीक्सचा अतिरिक्त वापर केला गेला असं लॅन्सेटनं (The Lancet) म्हंटलंय. पाहूयात लॅन्सेटच्या  (The Lancet) अहवालात नेमकं काय म्हंटलंय? (overuse of azithromycin antibiotic drug in country during and before corona report of lancet)

कोरोनाची लाट उच्चांकी पातळीवर असताना देशात अँटीबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असा दावा करण्यात येतोय. दक्षिणपूर्व आशियातील प्रसिद्ध मॅगझिन लॅन्सेटनं हा दावा केलाय. त्यामुळे अँटीबायोटिक्सच्या वापराबाबत अनेक सवाल उपस्थित होतायेत. लॅन्सेटट्या अहवालात नेमकं काय म्हंटलंय पाहूयात.

कोरोना काळात देशात 12 अँटीबायोटिक्सचा अतिरिक्त वापर झाला. त्यातही ऍजिथ्रोमायसिन सारख्या अँटीबायोटिक्सचं सेवन रूग्णांनी अधिक प्रमाणात केलं. विशेष म्हणजे बहुतांश औषधांची विनापरवानगी सर्रास विक्री करण्यात आली. या औषधांचे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतायेत असंही या लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हंटलंय. 

कोरोनातून ब-या झालेल्या रूग्णांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. ब-याच रूग्णांना यकृताचे आजार जडले आहेत. हा सर्व अतिरिक्त औषधं घेतल्याचा परिणाम असू शकतो असंही लॅन्सेटच्या अहवालात म्हंटलंय. 

याआधी कोरोना काळात डोलो गोळीच्या वापरावरूनही डॉक्टरांना एक हजार कोटींचे गिफ्ट वाटल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर अँटीबायोटिक्सच्या वापराबाबतचा हा अहवाल समोर आलाय. ही निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल.