Trending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का

Interesting Story : तुम्ही विमान प्रवास करताना ही गोष्ट लक्षात घेतली का? की पायलट आणि को पायलट यांना वेगळं वेगळं जेवण दिलं जातं ते? कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 

Updated: Dec 9, 2022, 10:46 AM IST
Trending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का title=
Trending News Discrimination between pilots and co-pilots food and both are given different food shocking reason nmp

Interesting Fact : आयुष्यात प्रत्येकाने एकदा विमान प्रवास (air travel) केला आहे. तर काही लोकांची विमानातून प्रवास करण्याची इच्छा आहे. उंच आकाशात भरारी घेणाऱ्या या विमानात (plane) अनेक नियम असतात. प्रवासी (passengers) असो वा हवाई सुंदरी असो किंवा विमानाचे सारखी पायलट असो यांचा साठी काही नियम असतात. हे नियम ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हवाईसुंदरींबद्दलचे (Air Hostess) अनेक किस्से तुम्ही ऐकलं असाल पण तुम्हाला हे माहिती आहे का? की विमानातील (flight) पायलट (pilot) आणि को पायलट (Co pilot) यांच्या जेवण्यात भेदभाव केला जातो. म्हणजेच या दोघांना कधीच एकसारखं जेवण (meal) दिलं जातं नाही. या दोघांचा आहार हा वेगवेगळा असतो. या दोघांना कधीच एकसारखे पदार्थ खायला देत नाही. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का? कारण ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल. तर चला जाणून घेऊयात असं का केलं जातं आणि यामागे काय कारण आहे नेमकं ते....

वेगवेगळं जेवण का दिलं जातं?

तर यामागचं कारण असं आहे की, पायलट आणि सह-वैमानिक समान अन्न खात नाहीत कारण जर एखाद्याला अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाली तर दुसरा विमान उडवू शकतो.

'या' घटनेनंतर घेण्यात आला निर्णय 

1984 मध्ये कॉनकॉर्ड सुपरसॉनिक विमान लंडनहून न्यूयॉर्कला (London to New York) जात होते. या फ्लाइटमध्ये धक्कादायक घटना घडली. या फ्लाइटमध्ये एकूण 120 प्रवासी होते. त्यावेळी सर्वांना एकसारखं जेवण देण्यात आलं होतं. मात्र त्या जेवणामध्ये काहीतरी गडबड होती. ज्यामुळे सर्वांना विषबाधा झाली. अन्नातून विषबाधा झाल्याने एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी पायलट आणि को पायलटला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. (Trending News Discrimination between pilots and co-pilots food and both are given different food shocking reason )

अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी अत्यंत सावधानी बाळगून एक कठोर निर्णय घेण्यात आला. पायलट आणि को पायलट या दोघांना वेगवेगळं जेवण दिलं जाईल. दोघांपैकी एकाची प्रकृती बिघडली तर दुसरा पायलट उपलब्ध असेल. सगळे अडथळे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. 

 

हेसुद्धा वाचा - Video : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवले गुंडाळून Metro मध्ये...

 

विषबाधा किंवा काही जेवणातून (food) कोणत्याही एका पायलटला त्रास झाला तर दुसरा व्यवस्थित सुखरुप प्रवाशांना पुढे घेऊन जाऊ शकतो हा त्यामागचा विचार आहे. पायलटला फर्स्ट क्लासचं तर को पायलटला बिझनेस क्लासचं जेवणं दिलं जातं. 

काही विमान कंपन्या कॉकपिटमध्ये क्रू मेंबर्ससाठी (Airport Cabin Crew) वेगळ्या जेवणाची सोय देखील करतात. तर पायलट आणि को पायलटसाठी वेगळी व्यवस्था केली जाते. एका मुलाखतीमध्ये कोरियन पायलटने देखील हेच सांगितलं होतं की विषबाधा होऊ नये आणि प्रवाशांना त्यामुळे समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.