आई ती आईच! जंगली प्राण्यापासून लेकीला वाचवलं; Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

Viral Video: व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड (Trending Video On Internet) होताना दिसतोय. मुलीला वाचवण्यासाठी आईचं धाडस पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

Updated: Dec 9, 2022, 01:00 AM IST
आई ती आईच! जंगली प्राण्यापासून लेकीला वाचवलं; Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Mother Saves Child From Raccoon Attack

Mother Saves Child From Raccoon: जगातील सर्वात मुल्यवान आणि अनोखी गोष्ट असेल तर ती आपली आई (Mother)... कोणत्याही मानसिक संकटात असो किंवा आर्थिक गोष्टीत नेहमी आपल्या बाजूने उभी राहते ती आई... आपल्या लेकरांसाठी कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यांची ताकद फक्त आईमध्ये असते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. या व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. (Mother Saves Child From Raccoon Attack Video goes Viral on internet marathi news)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झालेल्या व्हिडीओमध्ये एक जंगली प्राणी म्हणजेच रकूनने (Raccoon) एका लहान मुलीवर हल्ला करताना दिसतो. त्यानंतर आईने मदतीला धावत लेकीचे प्राण वाचवले. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड (Trending Video On Internet) होताना दिसतोय. मुलीला वाचवण्यासाठी आईचं धाडस पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा - लग्नाच्या मंडपात घडली भयानक घटना; एका क्षणातं होत्याचं नव्हत झालं

नेमकं काय झालं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत परदेशातील असल्याचं दिसतंय. एक मुलगी आपल्या घराच्या अंगणात खेळताना दिसते. तेवढ्यात त्याठिकाणी एक जंगली प्राणी रकून (Raccoon Attack) येतो आणि मुलीवर हल्ला करतो. मुलीने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रकूनची पकड मजबूत असल्याने मुलीने आरडाओरडा केला. मुलीचा आवाज ऐकून आई धावून आली.

पाहा Video -

दरम्यान, मुलीवर हल्ला झाल्याचं पाहून आईने (Mother Saves Child From Raccoon) जंगली प्राण्याला आधी हातात उचलून घेतलं आणि मुलीची प्रथम सुटका केली. त्यानंतर तिने मुलीला आत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर रानटी प्राण्याला लांब फेकून दिलं आणि ती आपल्या मुलीसह घरात सुरक्षित गेली. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Shocking Video) होताना दिसतोय.