Couple Viral Video : कपलला रस्त्यात रोमान्स करणं पडलं महागात, डान्स करताना तिला जवळ घेत अन् मग...

Couple Dancing on Street Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी अनेक जण कुठेही रील्स बनवतात. यूजर्स कसलाही विचार न करता सार्वजनिक ठिकाणी डान्स करतात. पण थांबा एका कपलला रस्त्यात रोमान्स करणं महागात पडलं आहे.   

Updated: Feb 2, 2023, 01:36 PM IST
Couple Viral Video : कपलला रस्त्यात रोमान्स करणं पडलं महागात, डान्स करताना तिला जवळ घेत अन् मग... title=
Trending news Iran Blogger couple jailed for more than 10 years over viral Romantic dancing video

Iranian Couple Dancing Viral Video : सोशल मीडियावर व्हिडीओ (Videos on social media) बनविणाऱ्या प्रत्येक यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. सोशल मीडियाच्या दिवसेंदिवस वाढता क्रेझ पाहता, तरुणाईला वेड केलं आहे असंच म्हणायला हवं. कसलीही लाज न बाळगता...अगदी जीवाची पर्वा न करता अनेक मुलं मुली सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ बनवतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध हे एक कारण तर आहेच पण या व्हिडीओच्या (Viral Video) माध्यमातून ते पैसेही कमावतात. गेल्या महिन्यात आपण कार, स्कूटर आणि अगदी बाइकवरही कपलला रोमान्स (Couple Romance Video) करताना पाहिलं आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण रस्त्यावर कपलला रोमान्स डान्स करताना महागात पडलं आहे. 

डान्स केली म्हणून शिक्षा!

हो हो बरोबर... एका कपलला रस्त्यात रोमान्स करणे महागात पडलं आहे. ते झालं असं की, त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांना थेट 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. रात्रीच्या वेळी कपल रस्त्यावर डान्स करत होतं. या रोमाँटिक डान्सचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि मग...(Trending news Iran Blogger couple jailed for more than 10 years over viral Romantic dancing video )

काय आहे नेमंक प्रकरण?

इराणची राजधानी तेहरानमध्ये फ्रीडम स्क्वेअर या परिसरात या कपलने स्ट्रीट डान्स ( iranian couple dance video) केला. या डान्सचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून इस्लामिक सरकारने आक्षेप घेतला. हे कपल सार्वजनिक ठिकाणी नाचणे आणि वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन दिले अशा आरोपाखाली त्यांना दोषी ठरवून 10 वर्षे 5 महिन्यांची शिक्षा ठोकवली. 

कोण आहे हे कपल?

हे कपल एक ब्लॉगर जोडपे (Blogger couple video) आहे. त्यांचं नाव आहे अस्तियाज हगिघी आणि अमीर मोहम्मद अहमदी...इराणच्या आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा डान्स व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला मिळणारी प्रसिद्धी पाहून इराण सरकारने त्यांना नोव्हेंबरमध्ये अटक केली. त्यानंतर सरकारविरोधात अपप्रचार करण्याबद्दल कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांना अशा प्रकारे डान्स करण्यास परवानगी नाही.