लाखो लोकांचा जीव वाचणारा शूर 'उंदीर' सेवानिवृत्त

वासाने गोष्टी शोधणार श्वान याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. परंतु स्निफर रॅट अर्थात वासाने गोष्टींचा शोध घेणाऱ्या उंदराबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?

Updated: Jun 20, 2021, 10:21 AM IST
लाखो लोकांचा जीव वाचणारा शूर 'उंदीर' सेवानिवृत्त title=

मुंबई :  स्निफर डॉग म्हणजेच वासाने गोष्टी शोधणार श्वान याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. परंतु स्निफर रॅट अर्थात वासाने गोष्टींचा शोध घेणाऱ्या उंदराबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? अशाप्रकारचा उंदीर कंबोडियामध्ये आढळून आला आहे. 'मगावा' असे या उंदराचे नाव आहे आणि त्याच्या कामगिरीमुळेच तो सर्वत्र ओळखला जातो. तो आता पाचवर्षाच्या सर्विसनंतर सेवानिवृत्त झाला आहे. हो तुम्ही बरोबर वाचलात. श्वानांप्रमाणे आता उंदीर देखील सेवानिवृत्त झाला आहे.

आपल्या वास घेण्याच्या क्षमतेवरुन या लहानश्या उंदीराने तब्बल 1.4 लाख चौरस मीटर म्हणजेच जवळपास 20 फुटबॉल मैदाना इतक्या जमिनीला सुरंग मुक्त बनवायला मदत केली. याच गोष्टीमुळे तो प्रचंड लोकप्रिय आहे.

आतापर्यंत मगावाने जवळपास 71 लँडमाईन्स आणि 38 जिवंत स्फोटके शोधून काढले आहे. 'मगावा खूप चपळ आहे. मला त्याच्यासोबत काम करण्याचा खूप अभिमान वाटतो. कारण तो इतका लहान आहे, तरी त्याने अनेक लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे', असे मगावाच्या ट्रेनरने म्हटले आहे.

मगावाचे ट्रेनर पुढे म्हणाले, मगावा खूप थकला आहे. परंतू अजूनही तो खूप फिट आहे. मात्र, आता त्याचे वय झाले आहे. आता त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाण्याची संधी मिळाणार आहे.  त्याच्या मनात जे येईल ते तो करु शकतो.

लँडमाईन असल्याची शंका येताच, मगावा थांबायचा

मगावाला 2016 साली कंबोडियाध्ये आणले होते. तो तेव्हा दोन वर्षाचा होता. आता त्याला निवृत्त केले जात आहे. मगावाला जिथे लँडमाईन असल्याची शंका यायची तिथे तो लगेच थांबायचा. त्यानंतर तो ती जागा खोदण्यास सुरू करायचा. लँडमाईनचा शोध घेतल्यानंतर तो तेथून बाजूला व्हायचा आणि स्टाफ लँडमाईन आपले पुढचे काम करायचे. मगावाच्या कामगिरीबद्दल त्याला ब्रिटिश चॅरिटीकडून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

कंबोडियामध्ये गृहयुद्धादरम्यान बारूदचे बोगदे खोदले

कंबोडियामध्ये गृहयुद्ध सुरू असताना जंगलात हजारोच्या संख्येने सुरंग लावले गेले होते. येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय त्यावर पडताच त्या लँडमाईनचा स्फोट व्हायचा. यामुळे तेथील सरकार प्रचंड चिंतेत होती. त्यानंतर मगावाला एका एनजीओ एपीओपीओने लँडमाईन्स शोधण्याचे प्रशिक्षण दिले. आता तो जगातील सर्वात यशस्वी Rodents म्हणून ओळखला जातो.