याला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video

Viral Video : लहान कधी कधी असं काही करता किंवा बोलतात की आपण भारावून जातो. अशाच एका चिमुकलीच्या हृदयस्पर्शी व्हिडीओ नेटकऱ्यांचं मन हेलावून टाकतोय. 

Updated: Sep 5, 2023, 11:16 AM IST
याला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video title=
trending today school girl shares her tiffin with blind beggar video viral on Internet

Trending Video : लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं आपण म्हणतो. ही निरासग फुलं जगातील सगळ्या भेदभावापलीकडे असतात. त्यांना लहान मोठं, जातपात, गरीब श्रीमंत पाहत नाही. यांचं हृदय इतकं निर्मळ असतं की याच कोणासाठीही फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. लहान मुलं घरात असली की घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं. त्यांचा कृत्य आणि बोलणं अनेक वेळा मोठ्या मोठ्या लोकांना लाजवून टाकतं. (trending today school girl shares her tiffin with blind beggar video viral on Internet)

याला म्हणतात संस्कार!

सोशल मीडियावर एका गोंडस शाळकरी चिमुकलीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिकंत आहे. या चिमुकलीचे संस्कार पाहून प्रत्येक जण अवाक् होतं आहे. तिच्यामधील दयाळूपणाची भावना लाखो हृदयाला स्पर्श करत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक गोंडस शाळेत जाणारी चिमुकली रस्त्याच्या शेजारी असलेल्या भिकाऱ्याला पाहून थांबते. ती त्याला तिच्या जवळील पैसे देते. पण तिच्या लक्षात येतं तो भिकारी दृष्टीहीन आहे. ती चिमकुली भावूक होते आणि त्याच्या आईने शाळेत खाण्यासाठी दिलेला टिफीन ती त्या माणसाला देते. 

त्या माणसाला तो खाता येतं नाही, तर ती त्याला खाण्यासाठीही मदत करते. तु्म्ही पाहू शकता ती त्या व्यक्तीला सँडविच खाण्यासाठी मदत करते आणि पाणी पाजते. तिथे एक महिला येऊन थांबते आणि तिला विचारते तू काय करत आहे. त्यावर ती म्हणते तो व्यक्ती मला त्रास देत नसून मी त्याला मदत करत आहे. 

चिमुकलीने मदत केल्यानंतर तिने त्या व्यक्तीसोबत हात मिळवला. मुलीचं हे कृत्य दूर असलेल्या एक व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. 

त्या भिकारी व्यक्तीसाठी जणू ती देवदूतचं...आपण अनेक वेळा रस्त्यावरुन जाणाऱ्या भिकारी व्यक्तींना आपल्या पासून दूर करतो. अगदी काही लोक तर त्यांना शिव्या घालतात. पण या चिमुकलीचं हृदय इतकं निरागस आणि निर्मळ आहे की, ती त्याला मदत करते आणि खायला देते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्यामधील हा दयाळूपणा पाहून प्रत्येक जण असंच म्हणतंय की, संस्कार असावे तर असे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा डोळ्यात पाणी आणत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील queen of valley या अकाऊंटवर शेअर केला आहे.