Viral News : शेतात 'ती' देत होती फोटोसाठी पोझ आणि तेवढ्यात आली गाय अन् मग...

Cow Chasing Bikini Girl : शेतात उभी होती गोरी मेम...फोटोसाठी पोझ देताना तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. 

Updated: Mar 29, 2023, 03:46 PM IST
Viral News : शेतात 'ती' देत होती फोटोसाठी पोझ आणि तेवढ्यात आली गाय अन् मग... title=
trending video Bikini Girl posing in the field cow video viral on social media

Viral News : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. धक्कादायक व्हिडीओपासून लहान मुलांचं गोंडस व्हिडीओ आपले मनं जिंकतात. यातील काही व्हिडीओ पाहून तर आपल्याला हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करत आहे. शेतातील गोरी मेमचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 

झालं असं की, एक प्लेबॉय मॉडेल सुट्टीत कोलंबियातील एका शेतात गेली होती. त्यावेळी त्याचासोबत जे काही घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं. ती मॉडेल कॅमेऱ्यासमोर पोझ देत होती आणि तेवढ्यात मागून काही गायी तिच्या दिशेने आल्यात त्यानंतर तिची जी पळापळ झाली. ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. ही छोटीशी क्लिप सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. (trending video Bikini Girl posing in the field cow video viral on social media)

कोण आहे ही मॉडेल?

फ्रान्सिया जेम्स असं त्या मॉडेलचं नाव आहे. 32 वर्षीय फ्रान्सिया इंटरनेटसाठी व्हिडीओ बनवते. ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर बिकिनी आणि हाय हिल्सचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आहेत. या अकाऊंटवर काही व्हिडीओ आणि फोटो तर अतिशय विचित्र आणि आक्षेपार्ह आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्टाग्रामवर 11.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये फ्रॅन्सिटी म्हणून ओळखले जाते.

व्हिडीओ तुफान व्हायरल 

या व्हिडीओमध्ये जेव्हा ती मॉडेल शेतात उभी असते मागून काही गायी तिच्यावर हल्ला करणार आहेत असं वाटतं. म्हणून ती घाबरुन तिथून पळ काढते. या व्हिडीओला आतापर्यंत 132,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. यूजर्सही या व्हिडीओला वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे.