डिलिव्हरी बॉय 'पिझ्झा' द्यायला गेला, पण दरवाजा उघडल्यावर जे काही पाहिलं..., तुम्हालाही बसेल धक्का!

पिझ्झा डिलिव्हरी करायला गेलेल्या डिलिव्हरी बॉयने असं काय पाहिलं...मागे न बघता ठोकली धूम!

Updated: Oct 7, 2022, 06:54 PM IST
डिलिव्हरी बॉय 'पिझ्झा' द्यायला गेला, पण दरवाजा उघडल्यावर जे काही पाहिलं..., तुम्हालाही बसेल धक्का! title=

Trending Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. तसेच काही व्हिडीओ विचार करण्यास भाग पाडतात. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही जे काही दिसेल, ते पाहून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

पिझ्झा (Pizza) हा जवळपास सर्वांचा आवडता पदार्थ. पार्ट्यांमध्ये किंवा सुट्टयांच्या दिवशी अनेकजण पिझ्झा ऑर्डर करतात. अशीच एक ऑर्डर एका डिलिव्हरी बॉयकडे (Delivery Boy) पडली. नेहमीप्रमाणे डिलिव्हरी बॉयने ऑर्डर घेत दिलेल्या पत्त्यावर आला. नेहमीप्रमाणे पिझ्झा डिलीव्हरी केल्यावर हळूच दरवाजावर खटखट केली. मात्र, त्याला जे दिसलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. (Chimpanzee opens door to get pizza delivery boy gets scared)

डिलिव्हरी बॉयने दरवाजा ठोठवल्यावर समोरून माणूस येणं अपेक्षित होतं. मात्र, तिथून एक चिंपांझी (Chimpanzee) आला. चिंपांझीने दार उघडलं. चिंपांझीला पाहून डिलिव्हरी बॉयला धक्काच बसला. चिंपांझी हातात पैसे घेऊन (Chimpanzee Pizza Delivery Boy) आला होता. त्याने डिलिव्हरी बॉयला पैसे देण्यासाठी हात पुढे केला. 

पाहा Trending Video - 

घाबरत घाबरत डिलिव्हरी बॉयने पैसे घेतले आणि पिझ्झाचा बॉक्स त्याला दिला. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तिथून लगेच धुम ठोकली. हा व्हिडीओ रशियामधील असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा- शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याने मला मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिली होती, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!