Viral Video : तो Escalator वरुन उतरत होता अन् मग...क्षणातच गायब झाला

Viral Video : मॉल असो किंवा मेट्रो (Metro), मोनो (Mono), लोकल (mumbai local) रेल्वे स्टेशनवर आपल्याला Escalator पाहिला मिळतात. अनेकांना पायरी चढताना त्रास होतो, अशावेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायरी न चढता पोहोचण्यासाठी Escalator लावले गेले आहेत. पण या Escalator चा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Jan 23, 2023, 05:44 PM IST
Viral Video : तो Escalator वरुन उतरत होता अन् मग...क्षणातच गायब झाला title=
Trending Video Person Swallowed by Escalator Horrifying Viral on Social media

Escalator Swallows Man Viral Video : आजकाल पाहवं तिकडे आपल्याला धावते जिने म्हणजे Escalator पाहिला मिळतात. आपल्या सोयीसाठी मॉल (mall), विमानतळ (airport), मेट्रो असो किंवा रेल्वे स्टेशन (railway station) तिथे आपल्याला Escalator लावलेले दिसतात. या Escalator मुळे लोकांचा चालण्याचा त्रास वाचतो. ते एका माळ्यावरुन दुसऱ्या माळ्यावर सहज जाऊ शकतात. मॉलमध्ये तर Escalator शिवाय पर्यायचं नसतो. तो नसेल तर बंद लिफ्टमधून जावं लागतं. काही जणांना Escalator वरुन जायला भीती वाटते. कारण या धावत्या जिन्यावर त्यांना चढता येत नाही. पण या Escalator चा जेवढा फायदा आहे तेवढाच फटकाही बसू शकतो. कारण सध्या सोशल मीडियावर एक भयानक आणि हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

...अन् Escalator ने त्याला गिळलं

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, Escalator वर मोठ्या प्रमाणात लोकांची ये - जा सुरु आहे. काळा रंगाचे कपडे घातलेला एक व्यक्ती जसा Escalator वर येतो आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. तो व्यक्ती काही दूर जातच नाही तर एस्केलेटर तुटतं आणि तो व्यक्ती त्याचा आत पडतो. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की एका भयानक राक्षसाने त्या व्यक्तीला गिळलं. Escalator च्या तांत्रिक बिघाडल्यामुळे एक मोठी दुर्घटना होते. (Trending Video Person Swallowed by Escalator Horrifying Viral on Social media )

कधीची आहे घटना? 

एका वृत्तानुसार ही घटना फेब्रुवारी 2008 मधील आहे. ही घटना इस्तंबूल टर्कीमधील Ayazaga मेट्रो स्टेशनवर घडला होता. पण सध्या हा व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.  हा व्हिडीओ Oddly Terrifying Things या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.