VIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...

Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. 

Updated: Jan 9, 2023, 01:25 PM IST
VIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग... title=
trending video python looks like a banana viral on social media marathi news

Snake Video : सोशल मीडिया (Social media Video) हा अनेक व्हिडीओचा खजिना आहे. यात यूजर्सला कधी धक्कदायक, तर कधी आश्चर्यकारक व्हिडीओ (Viral Video) पाहिला मिळतात. निसर्गाच्या चमत्काराने अनेक वेळा आपण अवाक् होऊ जातो. निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना आपल्या त्या चमत्काराची कल्पना येते. पाना फुलांमध्ये अगदी प्राण्यांमध्येही देवाचा चमत्कार दिसून येतो.  रंग बसणारा सरडा असो किंवा सुकलेल्या पानासारखं दिसणारं फुलपाखरु असो, असे अनेक अद्भूत व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Shocking Video) नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतो आहे. 

केळं समजून लावला हात अन् मग...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ पाहिला पहिले वाटतं टेबलवर दोन केळं ठेवली आहेत. मात्र जेव्हा तो माणूस त्यातील एका केळीला हात लावतो. तेव्हा त्याला धक्काच बसतो. कारण ते केळं नसून तो एक भल्यामोठ्या साप होता. 

या सापाचं शरीर केळीसारखं दिसतं. त्यामुळे केळं आणि सापाला एकत्र पाहिल्यावर त्यांच्यातला फरक क्वचितच कुणाला दिसेल...हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सचे डोके चक्रावले आहेत. अनेक जण अजूनही गोंधळतात आहे की तो साप आहे की केळी...(trending video python looks like a banana viral on social media marathi news)

व्हिडीओ व्हायरल 

जगात अनेक प्रकारचे साप आढळत, पण हा केळ्यासारखा दिसणारा हा साप बनाना बॉल पायथन या नावाने ओळखला जातो. केळीसारखे दिसल्याने या सापाला केळीच्या नावावरूनच ओळखलं जातं. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. शिवाय हा व्हिडीओ ट्वीटरवरही Science girl या अकाऊंटवर शेअर केल्यानंतर ट्रेंडमध्ये आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सापाला हाताने उचलताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालेले युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.