वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प पराभव स्विकारण्यास तयार नसल्याने जो बायडेन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प आपला पराभव स्वीकारत नसले तरी जनतेने त्यांना नाकारले या वस्तुस्थितीची त्यांना चांगली जाणीव आहे.
चुकीचा संदेश गेला
ट्रम्प यांनी लोकशाहीचे नुकसान केल्याचा आरोप करत बायडेन म्हणाले की, निवडणुकीचे निकाल मान्य न करणे आणि घोटाळ्याचे निराधार दावे करणे हे दर्शवते की ट्रम्प यांना अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वृत्तीमुळे संपूर्ण जगात अमेरिकन लोकशाहीबद्दल चुकीचा संदेश गेला आहे'.
बेजबाबदार अध्यक्ष
मिशिगन विषयी एका प्रश्नाला उत्तर देताना जो बायडेन यांनी ट्रम्प यांना सर्वात बेजबाबदार अध्यक्ष म्हटले, ते म्हणाले की, "हा माणूस (ट्रम्प) कसा विचार करतो याचा अंदाज लावणे कठीण आहे. माझा असा विश्वास आहे की ट्रम्प पराभूत झाले आहेत ते जिंकू शकले नाही याची जाणीव त्यांना होईल.' डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीही आरोप केले तर ते 20 जानेवारीला शपथ घेणार असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये दाखल केलेला दावा मागे घेण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे, तर त्याच्यामागे नवीन योजना असण्याचीही शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगनमधील नेत्यांशी फोनवर चर्चा केली. काहींना व्हाईट हाऊसला बोलवण्यात आले. याबाबत अनेक प्रकारचे अनुमान लावले जात आहेत. दुसरीकडे, विस्कॉन्सिन निवडणूक आयोगाने 800,000 हून अधिक मतांची फेर मतमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा मतमोजणीची विनंती केली होती.