'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे'; ट्रॉली ओढणाऱ्याच्या मदतीला धावला वाटसरु, पाहून रडूच येईल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचे डोळे पाणावले.

Updated: Jul 26, 2022, 04:03 PM IST
'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे'; ट्रॉली ओढणाऱ्याच्या मदतीला धावला वाटसरु, पाहून रडूच येईल title=

Viral Video :  सोशल मीडियावर अनेक भावनिक आणि मन हेलावून टाकणारे व्हिडीओ आपण पाहत असतो. आपण रस्त्याने जाताना अनेक कष्ट करणारे कामगार पाहतो. पोटाची खळगी भरण्यासाठी किलोकिलोचे ओझे अंगावर लादून रस्त्याने ओढून नेताना दिसतात. हा व्हिडीओ अशाच एका कष्टकरी मजुराचा आहे. पण या मजुराला रस्त्यात एक देवमाणूस भेटतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचे डोळे पाणावले.

माणुसकी अजूनही जिंवत 

हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कामगार कोल्ड्रिंक आणि पाण्याच्या बाटल्या असलेली ट्रॉली दुकानाकडे घेऊन जात आहे. रस्त्यात एका ठिकाणी चढ येतो त्यामुळे त्याला ही ट्रॉली ओढणे कठीण जाते. त्याला खूप जास्त शारीरिक श्रम होतो. तरीही तो मोठ्या कष्टाने ती ट्रॉली ओढत पुढे जात आहे. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूने आपल्या दोन मुलींसह एक माणून जात होता. या मजुराचं कष्ट त्याला पाहवलं नाही. त्याचा हातात असलेले आईस्क्रीम त्याने मुलींना दिले आणि तो लगेचच त्या मजुराच्या मदतीसाठी येतो. त्या ट्रॉलीला तो मागून धक्का मारतो. मजुराला कळतं नाही की हे कसं, तो मागे वळून पाहतो आणि त्या देवमाणसाचे तो आभार मानतो. 

हा व्हिडिओ Figen ने सोशल मीडियाच्या ट्विटरवर अकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 9 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 3 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. तर हा व्हिडीओ आतापर्यंत 40 हजार वेळा शेअर करण्यात आला आहे. काही लोकांनी या व्यक्तीचं खूप कौतुक केलं आहे. 

आपण रस्त्याने जाताना आपल्याला अशी अनेक मंडळी दिसतात ज्यांना मदतीची गरज असते. मग आपण पण त्यांना मदत करा, बघा त्यांना मदत करुन तुम्हाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळेल. या आनंदाची तुलना कशासोबत पण होऊ शकत नाही.