जापानला शक्तिशाली वादळाचा तडाखा, वादळ टोकिओच्या दिशेने

जपानमध्ये शनिवारी आलेलं वादळ हेजिबीस आता, जपानची राजधानी टोकिओच्या दिशेने सरकत आहे. 

Updated: Oct 12, 2019, 06:53 PM IST
जापानला शक्तिशाली वादळाचा तडाखा, वादळ टोकिओच्या दिशेने title=

टोकिओ : जपानमध्ये शनिवारी आलेलं वादळ हेजिबीस आता, जपानची राजधानी टोकिओच्या दिशेने सरकत आहे. या वादळामुळे आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वादळ येण्याआधीच, वादळामुळे मुसळधार पाऊस झाला. वादळाआधी 16 लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.

वादळामुळे, वीज आणि परिवहन सेवा प्रभावित झाली आहे, यामुळे अनेक फ्लाईटस रद्द झाल्या आहेत. वादळाआधीच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. 1600 पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द झाली आहेत. तर चिबा भागातील 36 हजार घरांना वादळाचा फटका बसला आहे.

टोकिओ शहराच्या पूर्व भागातील चिबामध्ये एक व्यक्ती उलटलेल्या ट्रकमध्ये आढळला. तो मृत पावला होता. जपानच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व जपानमध्ये 216 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ पोहोचणार आहे.