बापमाणूस! एकाच व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुलं आणि 578 नातवंडे, अनोख्या कुटूंबाची चर्चा

एक व्यक्ती जास्तीत जास्त किती लग्न करून शकतो, एक, दोन अथवा तीन असे आपल्याला वाटते. मात्र त्याही पलिकडे अनेक लग्न करणारी माणसे आहेत. एका व्यक्तीने तब्बल 12 वेळा लग्न केले आहेत. त्याच्या एकट्याच्या 12 बायका (Wifes) आहेत.

Updated: Feb 4, 2023, 05:08 PM IST
बापमाणूस! एकाच व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुलं आणि 578 नातवंडे, अनोख्या कुटूंबाची चर्चा

Uganda Man : एक व्यक्ती जास्तीत जास्त किती लग्न करून शकतो, एक, दोन अथवा तीन असे आपल्याला वाटते. मात्र त्याही पलिकडे अनेक लग्न करणारी माणसे आहेत. एका व्यक्तीने तब्बल 12 वेळा लग्न केले आहेत. त्याच्या एकट्याच्या 12 बायका (Wifes) आहेत. या बायकांपासून त्याला 102 मुले आहेत. तर या मुलांनी जन्म दिलेल्या मुलांमुळे त्याला आता 578 नातवंडे आहेत. आता ज्याप्रकारे नातवंडाची आकडेवारी वाढतेय, ते पाहता त्यांना मुलांची नाव देखील आठवत नाहीयेत, अशी खरी परिस्थीती आहे. आता या अनोख्या कुटुंबियाची सोशल मीडियावर (Social media) चर्चा आहे.   

कोण आहे 'हा' माणूस?

युगांडा  (Uganda Man) या देशात राहणाऱ्या 68 वर्षीय व्यक्तीचे नाव मूसा हसह्या कसेरा असे आहे. या मूसाला 102 मुले आहेत आणि 578 नातवंडे आहेत. आता मुसाला त्यांची नावे देखील आठवत नाही. नातवंडांच्या नावांचा विचार केला तर त्यांना ते लक्षात ठेवण्यात अडचण येते. खरं तर मूसा याला 12 बायका आहेत.या 12 बायकांपासून त्याला 102 मुले आहेत. या मुलांचे वय 10 ते 50 वर्षांपर्यंत आहे. 

कुटूंब वाढवण्याची इच्छा नाही

मुसा हा युगांडाच्या (Uganda Man) बुटालेजा जिल्ह्यातील बुगिसा गावात राहतो. या गावातच त्याचे हे मोठं कुटूंब राहते. हे कुटूंब वाढवण्याबाबत तो आता सांगतो की, "आधी हे खुप मजेशीर वाटत होते,पण आता ही समस्या बनत चालली आहे. माझी तब्येत ढासळत चालली आहे. इतक्या मोठ्य़ा कुटुंबासाठी जेमतेम दोन एकरच जमीन आहे. माझ्या दोन बायकाही सोडून गेल्या आहेत. कारण मला अन्न, शिक्षण, कपडे या मूलभूत गोष्टी परवडत नव्हत्या. द मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पर्यटकांच आकर्षण 

मुसा याचे हे भलं मोठं कुटूंब पर्यटकांच आकर्षण ठरलंय. अनेक पर्यटक त्याचे हे कुटूंब पाहायला येतात, त्यांना भेटतात. त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य आता पन्हळी लोखंडापासून बनवलेल्या आणि मोडकळीस आलेल्या घरात राहतात, तर इतर अनेकजण जवळपास दोन डझन मातीच्या झोपड्यांमध्ये राहत असल्याचे तो सांगतो. 

इतकं मोठं कुटूंब का बनवलं?

"आम्ही दोनच भाऊ जन्माला आल्यामुळे, माझा कौटुंबिक वारसा वाढवण्यासाठी मला माझ्या भावाने, नातेवाईकांनी आणि मित्रांनी अनेक बायकांसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता.तो सल्ला त्याने मानला आणि लग्न करत गेला, जसं जसं लग्न होत राहील, तसं तस कुटूंबही वाढलं. तसेच एक यशस्वी गुरेढोरे व्यापारी म्हणून तो आपल्या मुलींशी लग्न करू इच्छिणाऱ्या कुटुंबांमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे त्याच्याकडे नियमितपणे अनेक कुटुंबे लग्नाची ऑफर देतात, ज्यापैकी काही 18 वर्षांच्या आहेत, असेही तो सांगतो.

दरम्यान सध्या मुसाच्या (Uganda Man)  या भल्या मोठ्या कुटूंबाची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्याचे हे कुटूंब पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.