ब्रिटन : अनेक देशात लोकं कोरोनाच्या नवीन लाटेचा सामना करत आहेत. कोरोनाच्या या नवीन आणि अधिक वेगाने पसरणाऱ्या संक्रामणामुळे पूर्वीपेक्षा जास्त लोकं बाधीत होत आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील कोरोनाच्या पहिल्या व्हेरिएंटचा तीव्र परिणाम होता असल्याचे समोर आले. परंतु लॉकडाउन आणि लसीकरणाच्या मदतीने परिस्थिती बर्यापैकी नियंत्रणात आणली गेली आहे. परंतु आता ब्रिटनमध्ये एक नवीन धोक्याची चाहूल लागत आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ट्रिपल म्यूटेशनची चर्चा सुरू झाली आहे. ही माहिती देताना आरोग्य सचिव मॅट हैनकॉक म्हणाले की, ट्रिपल म्युटंट कोरोना व्हायरस प्रकार पहिल्यांदा यॉर्कशायरमध्ये सापडला होता. याचा अभ्यास वैज्ञानिक करत आहेत. या नवीन प्रकाराबद्दल असे सांगितले जात आहे की, हे कोरोनाच्या पूर्वीच्या रूपांपेक्षा अधिक धोकादायक आणि संक्रामीत करणारे आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, पब्लिक हेल्थ इंग्लंडने शुक्रवारी सांगितले की, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे नाव VUI-21MAY-01 आहे, याचा सर्वप्रथम खुलासा एप्रिलमध्ये केला गेला. देशभरातून VUI-21MAY-01 चे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. आतापर्यंत यॉर्कशायर आणि हंबरमध्ये नवीन स्ट्रेनचे 49 केसेस मिळाल्या आहेत.
जर्मनीतील मंत्र्यांनी म्हटले आहे की, नवीन केसेसचा प्रसार रोखण्यासाठी ते कठोर पावले उचलण्यास मागे पुढे पाहाणार नाहीत. नवीन व्हेरिएंटच्या बातमीनंतर जर्मनीने ब्रिटनहून त्यांच्या देशात येणार्या लोकांना बंदी घातली आहे. नवीन नियमांनुसार, रविवार, 23 मे रोजी मध्यरात्रीपासून, ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडहून जर्मनीकडे जाणारे लोकं जर जर्मन नागरिक किंवा रहिवासी असतील तरच ते देशात प्रवेश करू शकतात.
ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 28 दिवसांत 6 लोकांचा मृत्यू झाला. देशात सुरू झालेल्या पहिल्या लसीकरण मोहिमेते 21 मे पर्यंत 37.73 मिलियन लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 22.07 मिलियन लोकांना दोन्ही लसीं देण्यात आल्या आहेत.