सर्वात मोठी बातमी । युक्रेनमधील झापोरीझ्झ्या अणुभट्टीवर रशियन फौजांचा ताबा

Russian forces seize control of Ukraine nuclear plant : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ताबा घेतला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चार मोठे स्फोट झाले आहेत.  

Updated: Mar 4, 2022, 04:12 PM IST
सर्वात मोठी बातमी । युक्रेनमधील झापोरीझ्झ्या अणुभट्टीवर रशियन फौजांचा ताबा title=

मास्को : Russian forces seize control of Ukraine nuclear plant : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ताबा घेतला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चार मोठे स्फोट झाले आहेत. रहीवासी भागातही रशियाने हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधील झापोरीझ्झ्या अणुभट्टीवर रशियन फौजांनी ताबा मिळविल्यानंतर अनेक शहरांत रशियन सैन्याने शिरकाव केला आहे. (Ukraine says Russian forces seize control of nuclear plant)

रशिया हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनची नवी दृश्य समोर आली आहेत. कीव्ह शहरातली ही दृश्य आहेत. कीव्ह शहर अक्षरश: भकास झाले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचे दिसून येते आहेत. ड्रोनने टीपलेली अतिशय विदारक अशी ही दृश्य आहे.

रशियन सैन्याने नागरिकांवरही हल्ले

युक्रेनमध्ये रशियन सैन्याने नागरिकांवरही हल्ले सुरु केलेत. मारियुपोल शहरात रशियन सैन्यानं एका जोडप्यावर गोळीबार केला. शहर सोडताना या जोडप्याला एका चेकपॉइंटवर नागरिकांचे मृतदेह आढळले. दोघांनीही मदत करण्याचा प्रयत्न करताच रशियाच्या अजाव बटालीयनमधील सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.

तर युक्रेनची राजधानी कीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्या विद्यार्थ्याला उपचारांसाठी कीवमध्ये नेण्यात आले आहे. नागरी उड्डयन राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी ही माहिती दिलीय.

रशियानं केलेल्या हल्ल्यांना युक्रेनी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. अनेक भागात रशियन सैनिकांना युद्दसामग्री सोडून पळ काढावा लागला आहे. रशियन सैन्याने सोडून दिलेला असाच एक रणगाडा युक्रेनच्या एका शेतक-यानं पळवलाय. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या शेतकऱ्यानं हा रणगाडा खेचून नेला आहे.