न्यू यॉर्क : युक्रेन-रशिया संघर्षावर संयुक्त राष्ट्र आमसभेची आपत्कालीन बैठक सुरू झाली असून संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटेनियो गुटेरेस यांनी युद्ध तातडीनं थांबवून नेत्यांनी चर्चेला सुरूवात केली पाहिजे, असं आवाहन केल आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये तुंबळ युद्ध सुरू असून, दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. रशियाच्या आक्रमकतेमुळे जगाला धडकी भरली आहे. एवढेच नाही तर रशियाने अणुयुद्धाचीही भाषा केली आहे.
'रशियानं सुरू केलेली अणुयुद्धाची भाषा थरकाप उडवणारी असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस म्हणालेत.
काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं या तातडीच्या आमसभेला परवानगी दिली होती. 11 विरुद्ध एका मतानं हा ठराव मंजूर झाला.
ठरावाच्या बाजुनं 9पेक्षा जास्त मतं पडल्यामुळे रशियाला नकाराधिकार वापरता आला नाही.
आता या आमसभेनंतर संयुक्त राष्ट्रे युद्धखोर रशियाविरोधात कठोर निर्णय घेतात का, याकडे जगाचं लक्ष लागलंय.