Unique Love Story : म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. प्रेमाला जात, पात, धर्म, प्रांत अशा मर्यादा नसतात. प्रेम ही एक निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल अशी भेट आहे. प्रेम आयुष्यात एकदातरी करून बघावं. कोणावर तरी जीव लावून बघावा. अशाच एका अनोख्या प्रेमाची सध्या जगभर चर्चा होतेय. एका महिला डॉक्टरचा (doctor) रुग्णालयातच काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यावर (housekeeping staff) जीव जडला. विशेष म्हणजे त्या महिला डॉक्टरनेच त्याला प्रपोजही केलं. त्यानेही तिचं प्रेम कबूल केलं आणि दोघांचं लग्नही झालं.
पाकिस्तानमधल्या ओकारा जिल्ह्यातल्या दीपालपूरमधली ही घटना आहे. या महिला डॉक्टरचं नाव किश्वर साहिबा असं आहे तर सफाई कर्मचाऱ्याचं नाव शहजाद आहे. दोघांनी मिळून एक युट्यूब चॅनेल बनवलं असून त्याचं नाव किश्वर व्हिलेज व्लॉग असं ठेवण्यात आलं आहे. विविध विषयांवर ते व्हिडिओज बनवतात आणि आपल्या युट्यूब चॅनेवर शेअर करतात.
डॉक्टर किश्वर साहिबा यांनी शहजादशी लग्न केल्यानतंर त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. एका युटयूब चॅनेलला त्यांची मुलाखतही झाली. या मुलाखतीत शहजादने सांगितलं माझ्या सारख्या अशिक्षित व्यक्तीचं डॉक्टर असलेल्या महिलेशी लग्न होईल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. डॉक्टर किश्वर यांना शहजादशी लग्न करण्यामागचं कारण विचारलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराचं सर्वांनीच कौतुक केलं आहे.
डॉक्टर किश्वर म्हणतात शहजाचं व्यक्तीमत्व आणि त्याचा प्रामाणिकपणा मला खूप आवडला. मी त्याला त्याला अनेकवेळा पाहिलंय तो समोरच्याशी बोलताना नेहमी आदराने बोलायचा. त्याचा हाच स्वभाव आपल्याला भावला आणि त्याला लग्नासाठी विचारचं असं ठरवलं, असं डॉक्टर किश्वर यांनी सांगितलं.
डॉक्टर किश्वर यांनी शहजादला केलं प्रपोज
डॉक्टर किश्वर यांना आपण आवडत असल्याचा शहजाद यांनी कधी विचारही केला नव्हता किंवा त्याच्या मनातही असा विचार आला नव्हता. डॉक्टर किश्वर यांनी शहजादचा मोबाईल नंबरही घेतला होता. एक दिवस डॉक्टर किश्वर यांनी शहदाजसमोर आपल्या प्रेमाची कबूली दिली. काही वेळ शहजादला हे सर्व स्वप्नवत वाटलं. पण अखेर त्याने डॉक्टर किश्वर यांच्याशी लग्न करण्याचं ठरलं.
लोकांचे टीका-टोमणे
या अनोख्या लग्नाची जितकी चर्चा झाली तितकीच त्यांच्यावर टीकाही झाली. एका उच्च शिक्षित महिलेने अशिक्षित सफाई कर्मचाऱ्याशी केलेलं लग्न लोकांना पटलेलं नाही. अनेकांनी डॉक्टर किश्वर यांना टोमणे मारले. यानंतर डॉक्टर किश्वर यांनी रुग्णालयतील नोकरी सोडली असून स्वत:चं क्लिनिक सुरु करण्याचा विचार सुरु केला आहे.