US Airstrikes Houthis: रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाइनदरम्यान सुरु असलेल्या युद्धाची दाहकता जगभर जाणवत असतानाच आता एका नव्या युद्धाला सुरुवात झाली आहे. इराण समर्थक हूथी बंडखोरांविरोधात अमेरिका आणि ब्रिटनने युद्धाची घोषणा केली आङे. अमेरिका आणि ब्रिटीश लष्कराने यमनमध्ये हूथी बंडखोरांच्या तळांवर एअरस्ट्राइक केला आहे. मिलाइल्स, फायटर जेटच्या मदतीने दोन्ही देशांच्या हवाईदलांनी मोठ्याप्रमाणात यमनमधील हूथी बंडखोरांच्या तळावर हल्ला चढवून ते उद्धवस्त केले. या हवाई हल्ल्यांमध्ये हूथी बंडखोरांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियाई देशांमध्ये तणाव आणखीन वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका आणि ब्रिटनने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यांना हूथी बंडखोरांनी जशाच तसं उत्तर दिलं. हूथी बंडखोरांनी लाल समुद्राच्याजवळून अमेरिकेच्या अनेक तळावर हल्ले केले. हूथी बंडखोरांनी हल्ल्याला उत्तर देताना इराण आणि इराकमधील अमेरिकी दूतावासांवर हल्ला केला. आपण यापुढेही अमेरिका आणि ब्रिटनच्या दूतावासांवर हल्ले करत राहणार असल्याचा इशारा या बंडखोरांनी दिला आहे. हूथीने यमनमध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट आणि हल्ले झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यमनमध्ये हूथींविरोधात केलेल्या कारवाईबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लाल समुद्रातील हजाजांवर हल्ले झाल्याच्या घटनांनंतर अमेरिका आणि ब्रिटीश लष्कराने संरक्षणार्थ केलेल्या कारवाईत यमनमधील इराण समर्थक हूथी बंडखोरांच्या तळांवर हल्ले केले आहेत, असं सांगितलं. बायडन यांनी ऑस्ट्रेलिया, बहरीन आणि कॅनडाच्या समर्थनाने हा हल्ला केल्याचा दावा केला आहे. बायडन यांनी गरज पडल्यास भविष्यातही लष्करी कारवाई करण्यापासून आम्ही मागे हटणार नाही असं म्हटलं आहे.
इस्रायइल आणि हमासदरम्यान सुरु असेलल्या युद्धापासून पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ हूथी बंडखोरांनी लाल समुद्रामध्ये सातत्याने जहाजांवर हल्ले करत आहे. यमनमधील या हूथी बंडखोरांनी मंगळवारी रात्रीही लाल समुद्रामध्ये काही बोटींवर हल्ले केले. ड्रोन्स आणि मिलाइल्सच्या मदतीने हे हल्ले करण्यात आले. खासगी गुप्तहेर कंपनी 'एम्ब्रे'ने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला यमनमधील बंदराचे शहर असलेल्या होदेइदा आणि मोखाजवळ झाला. होदेइदामध्ये जहाजांनी मिसाइल्स आणि ड्रोन पाहून याची माहिती अमेरिका आणि सहकारी देशांच्या युद्धनौकांना दिली. यानंतर युद्धनौकांनी या व्यापारी जहाजांना वेगाने पुढे जाण्याचे आदेश दिले.
हूथी शिया बंडखोरांचा एक गट आहे. 2014 मध्ये यमनच्या राजधानीवर त्यांनी ताबा मिळवला होता. काही दिवसांपूर्वी याच बंडखोरांनी लाल समुद्रामध्ये इस्रायलशीसंबंधित एका जहाजावर हल्ला केला होता. हूथी बंडखोरांनी हे हल्ले करण्यामागील उद्देश गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलकडून केले जाणारे हवाई तसेच जमिनीवरील हल्ले कमी करण्याचा आहे. हूथी बंडखोर स्वत:ला इराणशी संबंधित 'प्रतिरोध की धुरी' नावाच्या तुकडीचा भाग मानतात. यमनची राजधानी सना आणि देशातील बराचसा भाग नियंत्रणात ठेवणाऱ्या हूथी बंडखोराच्या हल्ल्यांमधील कारण हे लष्करी नसून राजकीय आहे. या बंडखोरांना या भागावर ताबा मिळवायचा आहे.